१२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:24+5:30

जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यासर्वांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नमुने निगेटीव्ह आढळले.

122 Passenger separation period is over | १२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपला

१२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपला

Next
ठळक मुद्देआतापर्यंत १७ जणांचे नमुने निगेटिव्ह : ५७४ व्यक्ती निगरानीत, पालावरील नागरिकांचे सर्वेक्षण केले सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात परदेशातून व बाहेर राज्यातून येणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यात २२२ प्रवाशी विदेशातून जिल्ह्यात आले होते. तर त्यांच्या संपर्कात एकूण ९४५ व्यक्ती आढळून आल्या होता. यापैकी १२२ प्रवाशांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी मंगळवारी (दि.३१) संपला. त्यामुळे आता १०० विदेशी प्रवाशी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या ४७४ जण अशा एकूण ५७४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्या प्रशासनाच्या देखरेखखाली आहेत.
जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यासर्वांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नमुने निगेटीव्ह आढळले. तर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण १८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १७ नमुने निगेटीव्ह तर केवळ १ जणांचा नमुना पाझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण विदेशातून २२२ प्रवाशी आले तर त्यांच्या संपर्कात ९४५ जण आले होते. मात्र यापैकी १२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी ३१ मार्च रोजी संपला.
त्यामुळे आता केवळ १०० विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेले ४७४ अशा एकूण ५७४ जणांंना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर प्रशासनाची नजर आहे. विशेष मागील पाच दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण अथवा संशयीत रुग्ण आढळून आला आहे. मात्र प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.

केटीएसमध्ये शंभर खाटांचे कक्ष सज्ज
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. मंगळवारी हा आकडा ३०२ वर पोहचला.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात शंभर खाटांचे विशेष कक्षाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
इतर राज्य व जिल्ह्यातून परतले ९ हजार नागरिक
कोरोनामुळे देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योग धंदे बंद पडल्याने रोजगारासाठी इतर जिल्ह्यात व राज्यात गेलेले मजूर व कामगार आपल्या जिल्ह्यात परतत आहे. ३१ मार्चपर्यंत एकूण ९०१३ जण आलेले आहेत. तर विदेशातून २२२ जण परतले आहे. या सर्वांवर प्रशासनाने नजर ठेवली आहे.

पोलिसांनी उचलली कठोर पाऊले
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र यानंतरही नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुध्दा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा फास आवळला असून त्यांना आता प्रसाद देण्यास सुरूवात केली आहे.
 

Web Title: 122 Passenger separation period is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.