वास्कोत ‘स्पा’च्या नावाखाली चालत होता वेश्या व्यवसायाचा अड्डा; महीलेसह एका तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 08:26 PM2020-01-15T20:26:11+5:302020-01-15T20:42:24+5:30

वास्को पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी संध्याकाळी सदर छापा टाकण्यात आला.

 There was a prostitute operating under the name of 'Spa' in Vasco; Man arrested with woman | वास्कोत ‘स्पा’च्या नावाखाली चालत होता वेश्या व्यवसायाचा अड्डा; महीलेसह एका तरुणाला अटक

वास्कोत ‘स्पा’च्या नावाखाली चालत होता वेश्या व्यवसायाचा अड्डा; महीलेसह एका तरुणाला अटक

Next

वास्को: वास्को पोलीसांनी मुंडव्हेल, वास्को येथे असलेल्या एका ‘स्पा अ‍ॅण्ड सलून’ वर छापा मारून तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली. या तरुणींना येथे जबरदस्तीने वेश्या व्यवसायात गुंतवल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी संशयित शायनी जोझेफ या ४५ वर्षीय महीलेसहीत निधीन लाल या ३२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

वास्को पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी (दि.१४) संध्याकाळी सदर छापा टाकण्यात आला. वास्कोत असलेल्या ‘वाइल्ड ओरचिड’ या स्पा अ‍ॅण्ड सलूनमध्ये वेश्या व्यवसाय होत असल्याची माहीती पोलीसांना मिळताच याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसांनी सापळा रचला. मंगळवारी संध्याकाळी पोलीसांनी अचानक छापा मारला असता याठिकाणी वेश्या व्यवसाय होत असल्याच्या काही गोष्टी त्यांच्यासमोर स्पष्ट झाल्या. तसेच तपासणी वेळी येथे तीन तरुणींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे पोलीसांना कळताच त्या तरुणींची येथून सुटका करण्यात आल्याची माहीती पोलीसांनी दिली.

 छापा मारून सदर वेश्या व्यवसाय प्रकरणाचा सखोल तपास व चौकशी केल्यानंतर या तरुणींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकललेल्या संशयित निधीन लाल याला मंगळवारी मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली असून शायनी जोझेफ हीला बुधवारी (दि.१५) सकाळी अटक केल्याची माहीती वास्को पोलीसांनी दिली. पोलीसांनी अटक केलेली संशयित शायनी जोझेफ काही काळापासून वास्को राहत असून ती मूळ केरळ येथील असल्याचे पोलीसांनी सांगितले. तसेच निधीन लाल हा तरुण सुद्धा मडगाव येथे काही काळापासून राहत असून तो मूळ केरळ येथील असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. 

सदर वेश्या व्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित निधीन लाल हा एक नामावंत फुटबाल खेळाडू असल्याची माहीती पोलीसांनी दिली. वास्को पोलीसांनी सदर प्रकरणात अटक केलेल्या संशयिताविरुद्ध भादस ३७० कलम तसेच इंमोरल ट्रेफीक एक्ट कायद्याच्या ३, ४, ५ व ७ कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. दोन्ही संशयितांना बुधवारी वास्को पोलीसांनी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीक्षाने दिला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. वास्को पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  There was a prostitute operating under the name of 'Spa' in Vasco; Man arrested with woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.