दहेज मिनरल्सचे संचालक उदय महात्मे यांना समन्स
By Admin | Updated: July 12, 2014 01:45 IST2014-07-12T01:44:02+5:302014-07-12T01:45:31+5:30
पणजी : दहेज मिनरल्सचे संचालक उदय महात्मे यांना एसआयटीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले असून त्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे.

दहेज मिनरल्सचे संचालक उदय महात्मे यांना समन्स
पणजी : दहेज मिनरल्सचे संचालक उदय महात्मे यांना एसआयटीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले असून त्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे. दरम्यान, या खाण कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट पिकळे यांची शुक्रवारी सुमारे चार तास जबानी घेण्यात आली.
पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकळे यांनी आपण या कंपनीच्या हिशेब तपासणीचे काम काही काळ केले असल्याचे स्पष्ट केले आहे. दहेज मिनरल्सचे दोन संचालक सध्या एसआयटीच्या स्कॅनरखाली असून दुसऱ्या संचालकाचे नाव गिरीश पै असे आहे. राणे पिता-पुत्रांना ६ कोटी रुपये लाच दिली ती गिरीश यांनीच, असे भालचंद्र नाईक यांनी जबानीत म्हटले असून दुसरीकडे राणे पिता-पुत्रांविरुद्धची विधाने मागे घ्यावी, यासाठी उदय महात्मे यांनी आपल्याला विनंती केली होती, असेही भालचंद्र यांचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोघांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे.
राणे पिता-पुत्रांनी खाण प्रकरणात १0 कोटींची लाच मागितल्याचा आरोप भालचंद्र यांनी केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात एसआयटीने राणे पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हे नोंदविल्यानंतर दोघेही अटकपूर्व जामिनासाठी सीबीआय न्यायालयात गेले. या प्रकरणावर न्यायालयात पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)