म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा, सकारात्मक उत्तर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 07:27 PM2019-12-11T19:27:53+5:302019-12-11T19:28:00+5:30

म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली.

prakash Javadekar of Mhadai CM, positive answer will come | म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा, सकारात्मक उत्तर येणार

म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा, सकारात्मक उत्तर येणार

Next

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केंद्रीय वन व  पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली. पर्यावरण मंत्रलयाकडून लवकरच सकारात्मक उत्तर येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले.

कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळवू नये म्हणून राज्यात आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, जावडेकर मंगळवारीच स्पेनच्या दौ-यावरून दिल्लीत परतले आहेत. आपण त्यांना फोन केला व म्हादईप्रश्नी विचारणा केली. जावडेकर यांनी आपण स्पेनहून परतल्याने आता अधिका-यांकडून आढावा घेतो व लवकरच उत्तर पाठवतो असे स्पष्ट केले. जावडेकर यांच्या मंत्रलयाकडून निश्चितच सकारात्मक उत्तर येईल असा मला विश्वास आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही वन मंत्रलयाला स्मरणपत्र व अन्य माहिती मंगळवारी पाठवली आहे. आम्ही म्हादईच्या खो:याला दिलेल्या भेटीवेळी स्थिती कशी होती व आता स्थिती कशी आहे हेही कळवले आहे. जावडेकर हे सकारात्मक आहेत. कर्नाटकला कळसा भंडुरा प्रकल्पासाठी पर्यावरण मंत्रलयाने दिलेले पत्र मागे घ्यावे किंवा ते पत्र स्थगित ठेवावे, अशीच आमची मागणी आहे. तसेच यापुढे कसलीच मान्यता केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला देऊ नये व जर मान्यता द्यायचीच झाली तर त्याविषयी गोवा सरकारला विश्वासात घेतले जावे, असेही आम्ही पर्यावरण मंत्रालयाला कळवले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपण स्मरणपत्र पाठवणो किंवा जावडेकर यांना फोन करणो याच्याशी कर्नाटकच्या निवडणूक निकालाच्या विषयाचा काही संबंध नाही असाही दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला.

Web Title: prakash Javadekar of Mhadai CM, positive answer will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.