टँकरमधून पेट्रोल चोरताना गोव्यात तिघांना अटक; तर एक आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:30 PM2019-08-28T22:30:21+5:302019-08-28T22:35:15+5:30

वास्कोहून राज्यातील अन्य भागातील पेट्रोलपंपाला इंधन पुरवठा करणाऱ्या टँकरमधून पेट्रॉल चोरी करण्याच्या घटना घडू लागल्या असून, फातोर्डा पोलिसांनी अशाच एका घटनेत तिघाजणांना अटक केली आहे.

petrol adatration gang burst at goa | टँकरमधून पेट्रोल चोरताना गोव्यात तिघांना अटक; तर एक आरोपी फरार

टँकरमधून पेट्रोल चोरताना गोव्यात तिघांना अटक; तर एक आरोपी फरार

Next

मडगाव: वास्कोहून राज्यातील अन्य भागातील पेट्रोलपंपाला इंधन पुरवठा करणाऱ्या टँकरमधून पेट्रॉल चोरी करण्याच्या घटना घडू लागल्या असून, फातोर्डा पोलिसांनी अशाच एका घटनेत तिघाजणांना अटक केली आहे. एकजण फरार आहे. सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या रिवण येथील भारत पेट्रोलियम पंपाला या टँकरमधून इंधन पुरवठा होत होता. मागच्या काही दिवसांपासून इंधनचा पुरवठा कमी होत असल्याचे फळदेसाई यांना आढळून आले होते. संशय बळावल्याने  काल त्यांनी आपल्या कामगारांना वास्कोहून इंधन घेउन येणा:या टँकरच्या  पाळतीवर ठेवले होते.

तसेच इंधन चोरताना या कर्मचाऱ्यांनी हा टँकर पकडला. मागाहून यासंबधी फातोर्डा पोलिसांना कळविण्यात आले. दस्तगिर पठाण ( झुआरीनगर) व कृपाशंकर पटेल (बोगमळा) व राजेश नाईक (मालभाट - मडगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.  भारतीय दंड संहितेंच्या 379 कलमाखाली पोलिसांनी या संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. दस्तगिर हा टँकरचा चालक तर कृपाशंकर हा क्लिनर आहे. भारतीय दंड संहितेंच्या 379 कलमाखाली पोलिसांनी या संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश गडेकर पुढील तपास करीत आहेत.
 

वास्कोहून रिवणला जाण्यासाठी निघालेला हा टँकर पुर्व बगल मार्गावरील मडगावातील मारुती मंदिर नजिक टँकर पार्क केला. यावेळी तेथे दोघेजण गॅलन घेऊन आले होते. टँकरमधून गॅलनमध्ये पेट्रोल भरताना फळदेसाई यांच्या कामगारांनी त्यांना पाहिले. टँकर चालकाला यासंबंधी विचारले असता, आपली चोरी उघडकीस आल्याचे पाहून  त्या दोघाजणांनी घटनास्थळाहून पळ काढला. यातील राजेशला मागाहून पोलिसांनी अटक केली तर अन्य एक फरार आहे. त्याचा शोध चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सानिल बावकर हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत.
दरम्यान, सुभाष फळदेसाई यांनी लोकमतशी बोलताना इंधन चोरीच्या घटनेमागे संघटीत गँगचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला. वाटेत टँकर थांबवून इंधनची चोरी केली जाते व पंपावर टॅकर आणताना इंधनाचे माप ठरविक पध्दतीने वाढवून ही लूट केली जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: petrol adatration gang burst at goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.