BREAKING: गोव्यात आजच शपथविधी? प्रमोद सावंत राज्यपालांची भेट घेणार, संध्याकाळी भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:07 PM2022-03-10T16:07:54+5:302022-03-10T16:08:17+5:30

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून केवळ एक जागा दूर आहे. पण गोव्यात निवडून आलेल्या तीन अपक्ष उमेदवारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Oath taking ceremony likely to held Goa today Pramod Sawant to meet Governor | BREAKING: गोव्यात आजच शपथविधी? प्रमोद सावंत राज्यपालांची भेट घेणार, संध्याकाळी भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता

BREAKING: गोव्यात आजच शपथविधी? प्रमोद सावंत राज्यपालांची भेट घेणार, संध्याकाळी भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता

googlenewsNext

पणजी-

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून केवळ एक जागा दूर आहे. पण गोव्यात निवडून आलेल्या तीन अपक्ष उमेदवारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. यातच भाजपाकडून गोव्यात आजच सत्तास्थापनेचा दावा आणि सरकार देखील आजच संध्याकाळी स्थापन केलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाकडे १९ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसला १२ जागांवर यश प्राप्त झालं आहे. टीएमसी आणि मित्र पक्षांकडे तीन जागा आहेत. तर आम आदमी पक्षालाही दोन जागांवर यश मिळालं आहे. अशावेळी गोव्यात सत्तास्थापनेसाठी आघाडीचं आणि आमदारांच्या पळवापळवीचं राजकारण सुरू होऊ नये याची पुर्णपणे काळजी भाजपाकडून घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार असून सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी भाजपा सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.  

गोव्यातील सध्याची परिस्थिती-
एकूण जागा- ४०
बहुमताचा आकडा- २१

भाजपा- १९
काँग्रेस- १२
आप- ०२
मगोप- ०३
इतर- ०४

Web Title: Oath taking ceremony likely to held Goa today Pramod Sawant to meet Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.