काँग्रेस आमदार लुइझिन फालेरोंचा आमदारकीचा राजीनामा, 'या' पक्षात प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:53 PM2021-09-27T13:53:14+5:302021-09-27T13:53:44+5:30

काँग्रेसला सोडचिठ्ठी : तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Luisin Faleron resigns as MLA, bye-bye to Congress in goa | काँग्रेस आमदार लुइझिन फालेरोंचा आमदारकीचा राजीनामा, 'या' पक्षात प्रवेश करणार

काँग्रेस आमदार लुइझिन फालेरोंचा आमदारकीचा राजीनामा, 'या' पक्षात प्रवेश करणार

Next
ठळक मुद्देगोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असून या घडामोडीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते.

पणजी : गोव्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दुपारी सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला. तृणमूल काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत. नावेलीत कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर लुइझिन दुपारी थेट पर्वरी येथील विधानसभा संकुलात आले आणि त्यांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला.

गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असून या घडामोडीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. कालांतराने काग्रेसला गळती लागली. जुलै २०१९ मध्ये दहा काँग्रेसी आमदार फुटून भाजपवासी झाले. त्याआधी दोघे फुटले होते. काँंग्रेसकडे केवळ  पाच आमदार शिल्लक राहिले होते. लुइझिन यांनी राजीनामा दिल्याने आता पक्षाकडे केवळ चार आमदार बाकी राहिले आहेत. ४० सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपकडे २७, अपक्ष ३, काँग्रेसकडे ४, राष्ट्रवादी आणि मगोपकडे प्रत्येकी १ आणि गोवा फॉरवर्डकडे ३ आमदार आहेत. लुइझिन यांच्या राजीनाम्यामुळे एक जागा रिकामी झाली आहे.

राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लुइझिन म्हणाले की,‘तब्बल २० दिवस चिंतन केल्यानंतरच मी हा निर्णय घेतलेला आहे. गोव्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी मी हे पाऊल उचलले आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्र्जींचा फॉर्म्युला प्रधानमंत्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर भारी पडला. गोव्यात भाजपचा पाडाव करण्यासाठी अशाच लढतीची गरज आहे.’
 

Web Title: Luisin Faleron resigns as MLA, bye-bye to Congress in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.