विदेशी चार्टर विमाने बंद; यंदा गोव्यात भासणार विदेशी पर्यटकांचा अभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 08:57 PM2020-12-23T20:57:18+5:302020-12-23T20:57:37+5:30

Goa News: लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी दाबोळी विमानतळावर खास विमानांची सुविधा उपलब्ध केल्यानंतर २५ मार्च ते २१ डीसेंबरपर्यंत अशा काळात ८२ खास विमानातून १५ हजार विदेशी नागरिक व २०२ लहान मुलांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले.

Goa lacks foreign tourists this Christmas - New Year as foreign charter flights not started | विदेशी चार्टर विमाने बंद; यंदा गोव्यात भासणार विदेशी पर्यटकांचा अभाव 

विदेशी चार्टर विमाने बंद; यंदा गोव्यात भासणार विदेशी पर्यटकांचा अभाव 

Next

पंकज शेट्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: 
लॉकडाऊननंतर भारतात अजूनही विदेशी चार्टर विमाने सुरू केली नसल्याने अनेक वर्षापासून नाताळ व नवीन वर्ष जल्लोषात साजरे करण्यासाठी गोव्यात येणारे विदेशी पर्यटक यावर्षी पहायला मिळणार नाहीत. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार डीसेंबरात विदेशी चार्टर विमानातून ३० हजाराहून जास्त पर्यटक गोव्यात आले असून यंदाच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने हे विदेशी पर्यटक गोव्यात पोचणार नसल्याने पर्यटक क्षेत्रातील व्यवसायांना बरीच आर्थिक नुकसानी सोसावी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


गोव्यात दरवर्षी आॅक्टोंबरच्या सुमारास पर्यटक हंगामा मौसमाला सुरवात झाल्यानंतर मार्चपर्यंत विविध राष्ट्रातून शेकडो विदेशी पर्यटकांना घेऊन चार्टर विमाने गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरायची. यावर्षी मार्च महीन्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर काही महीन्यानी तो हटवण्यात आला, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अजूनही विदेशी चार्टर विमाने सुरू केली नाहीत. यामुळे यंदा गोव्यात नाताळ - नवीन वर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी होणाºया पार्टी - कार्यक्रमांना दर वर्षी चार्टर विमानाने येणारे शेकडो विदेशी पर्यटक दिसून येणार नाहीत. २०१९ च्या आकडेवारीनुसार आॅक्टोंबर ते डीसेंबर या तीन महीन्यात दाबोळीवर विविध राष्ट्रातून २७२ चार्टर विमाने विदेशी पर्यटकांना घेऊन उतरली असून यातून सुमारे ६८ हजार विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले होते.

यापैंकी ३० चार्टर विमाने आॅक्टोबर तर ११६ नोव्हेंबर महीन्यात उतरल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांच्याकडून प्राप्त झाली. डीसेंबरात नाताळ - नवीन वर्ष येत असल्याने याकाळात गोव्यात मोठ्या प्रमाणात ‘पार्टीचा मूड’ दिसून येत असून यात सहभागी होण्यासाठी विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात गोव्यात पोचतात. २०१९ सालात डीसेंबरात १२६ चार्टर विमाने सुमारे ३० हजार विदेशी पर्यटकांना घेऊन दाबोळीवर उतरली होती. पर्यटक हंगामा काळात तसेच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येणाºया विदेशी पर्यटकात रशिया, इस्त्रायल, युक्रेन, खजाकिस्तान, युनायटेड किंगडम, इराण, स्पेन, इटली, जर्मनी इत्यादी विविध राष्ट्रातील नागरिकांचा समावेश असतो. पर्यटक हंगामा सुरू झाल्यानंतर नवीन वर्ष सुरू होऊन पुढचे काही महीने सुद्धा गोव्यात राष्ट्रीय पर्यटकांबरोबर विदेश पर्यटकांची मोठी वर्दळ दिसून येते. याकाळात उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील समुद्र किनाºयांवर, शॅक, हॉटेलस, पार्टी व अन्य कार्यक्रमात विदेशी पर्यटकांचा मोठा समावेश दिसून येतो. यामुळे गोव्यातील विविध पर्यटक व्यवसायांना चांगला आर्थिक फायदा होतो. लॉकडाऊननंतर अजून विदेशी चार्टर विमाने चालू केली नसल्याने यावर्षी गोव्यात होणाºया नाताळ - नवीन वर्षांच्या  कार्यक्रमात, येथील समुद्र किनाºयावर चार्टर विमानातून येणाºया विदेशी पर्यटकांचा अभाव भासणार हे नक्कीच.

चार्टर विमाने सुरू झाली नसली तरी गोव्यात डीसेंबरात राष्ट्रीय पर्यटकांत यंदा वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे काहींकडून बोलण्यात येत आहे, मात्र विदेशी पर्यटकांच्या अनुपस्थिती मुळे विविध पर्यटक व्यवसायांना होणारी नुकसानी यातून भरून काढणे शक्यच नसल्याचे समजते.

लॉकडाऊननंतर अजूनपर्यंत गोव्यात अडकलेल्या १५ हजार विदेशी नागरिकांना खास विमानातून त्यांच्या मायदेशी पाठवले
लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी दाबोळी विमानतळावर खास विमानांची सुविधा उपलब्ध केल्यानंतर २५ मार्च ते २१ डीसेंबरपर्यंत अशा काळात ८२ खास विमानातून १५ हजार विदेशी नागरिक व २०२ लहान मुलांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले. यात रशिया, इटली, स्पेंन, जर्मनी, युके, युएसए, इंगलंण्ड, मंगोलीया, स्वीजरलेंण्ड अशा विविध राष्ट्रातील विदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.

Web Title: Goa lacks foreign tourists this Christmas - New Year as foreign charter flights not started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.