Goa Assembly Result 2022: गोव्यात उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:01 PM2022-03-10T12:01:57+5:302022-03-10T12:03:43+5:30

Goa Assembly Result 2022: गोव्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदार संघाचा निकाल हाती आला आहे. भाजपानं तिकीट न दिल्यानं अपक्ष उमेदवार राहिलेल्या उत्पल पर्रिकरांना मतदारांनी नाकारलं आहे.

Goa Election Results 2022 Babush Monserrate Wins Panaji as Utpal Parrikar Concedes Defeat | Goa Assembly Result 2022: गोव्यात उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

Goa Assembly Result 2022: गोव्यात उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

googlenewsNext

Goa Assembly Result 2022: गोव्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदार संघाचा निकाल हाती आला आहे. भाजपानं तिकीट न दिल्यानं अपक्ष उमेदवार राहिलेल्या उत्पल पर्रिकरांना मतदारांनी नाकारलं आहे. उत्पल पर्रिकरांचा 711 मतांनी पराभव झाला आहे. भाजपाचे बाबूश मोन्सेरात हे विजयी झाले आहेत. उत्पल पर्रिकर हे गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र आहेत. 

गोव्यात सध्याची परिस्थिती पाहता भाजपा १७ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसचे उमेदवार १२ जागांवर आघाडीवर आहेत. टीएमसी आणि मित्र पक्षाचे उमेदवार ४ जागांवर आघाडीवर आहेत. "एक अपक्ष उमेदवार म्हणून मी लढत चांगली दिली. सर्व मतदारांचे मी आभार मानतो. लढत समाधानी होती. पण पराभव किंचित निराशाजनक आहे", असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Goa Election Results 2022 Babush Monserrate Wins Panaji as Utpal Parrikar Concedes Defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.