Goa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीसोबत मिळून देणार भाजपला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 01:22 PM2022-01-21T13:22:35+5:302022-01-21T13:23:36+5:30

Goa Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवण्याची केली होती घोषणा. उत्पल पर्रीकरांबाबतही केलं मोठं वक्तव्य.

Goa Election 2022 shiv sena declared first candidate list with ncp sanjay raut praful patel bjp | Goa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीसोबत मिळून देणार भाजपला टक्कर

Goa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीसोबत मिळून देणार भाजपला टक्कर

Next

गोव्यात विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष युती करणार आहेत. शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युती करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. यानंतर आता शिवसेनेनं निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना गोव्यात १२ जागांवर लढणार असून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पहिल्या ९ उमेदवारांची घोषणा केली.

संजय राऊत यांनी शुक्रवारी ९ नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. तसंच उर्वरित तीन जागांबद्दल शनिवारी सांगण्यात येणार असल्याचं राऊत यांनी नमूद केलं. आम्ही संबंधित मतदारसंघातील सामान्य चेहऱ्यांना संधी दिली आहे. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेतेही गोव्यात प्रचारासाठी येणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या ठिकाणी प्रचाराकरिता येणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

गोव्याच्या राजकारणार शिवसेना नवीन नाही. आम्ही २०१७ मध्येही गोव्यातील निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी वातावरण गढूळ झालंय. अनेक राजकीय पक्ष नव्यानं निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतंय हेदेखील स्पष्ट होत नसल्याचं राऊत म्हणाले.

मन वळवण्याचा प्रयत्न करू
पणजीतून उत्पल पर्रीकरांना भाजपनं तिकीट नाकारलं आहे. कोणाला तिकीट द्यायचं हा भाजपचा प्रश्न आहे. उत्पल पर्रीकरांवर भाजपकडून होत असलेला अन्याय गोव्याची जनता पाहत आहे. मनोहर पर्रीकरांचं गोव्यासाठी मोठं योगदान आहे आणि हे गोव्याची जनता विसरली नाही. भाजपनं आपण जिंकू या भ्रमात राहू नये, असं राऊत म्हणाले. उत्पल पर्रीकर यांना स्वतंत्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इतर पक्षांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोणाला कोणत्या मतदारसंघातून संधी?

पेडणे - सुभाष केरकर

म्हापसा - जितेश कामत

शिवोली - विल्सेट परेरा

हळदोणे - गोविंद गोवेकर

पणजी - शैलेश वेलिंगकर

पर्ये - गुरुदास गावकर

वास्को - मारुती शिरगावकर

केपे - अ‍ॅलेक्स फर्नांडिस

वाळपई - देवीदास गावकर

Web Title: Goa Election 2022 shiv sena declared first candidate list with ncp sanjay raut praful patel bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.