Goa Election 2022: मगोपच्या बड्या नेत्याने भाजपची ऑफर नाकारली! पक्षप्रवेशास नकार, उमेदवारासाठी शोधाशोध सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 09:40 AM2022-01-17T09:40:33+5:302022-01-17T09:41:09+5:30

Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः चर्चा करूनही बड्या नेत्याने ऑफर नाकारल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे.

goa election 2022 mgp leader rejected bjp offer search for candidates continues in bicholim | Goa Election 2022: मगोपच्या बड्या नेत्याने भाजपची ऑफर नाकारली! पक्षप्रवेशास नकार, उमेदवारासाठी शोधाशोध सुरुच

Goa Election 2022: मगोपच्या बड्या नेत्याने भाजपची ऑफर नाकारली! पक्षप्रवेशास नकार, उमेदवारासाठी शोधाशोध सुरुच

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अचानक डिचोली मतदारसंघाबाबत वेगळी खेळी कालपासून सुरू केली. मगोपचे नेते नरेश सावळ यांना भाजपने पक्षप्रवेशाची ऑफर दिली. सावळ यांनी ती नाकारली. राजेश पाटणेकर यांच्याऐवजी डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना तिकीट देण्याचा विचार भाजप करू लागला आहे.

आमदार राजेश पाटणेकर यांना कोविडची लागण झाली, शिवाय त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत पूर्वीएवढा रस राहिलेला नसावा, असे पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना वाटते. भाजपच्या तिकिटाचा विचार केला तर पाटणेकर हेच अजून प्रबळ उमेदवार आहेत. शिवाय कार्यकर्तेही पाटणेकरांसोबत आहेत पण सरकारने पाटणेकर यांना नोकऱ्यांचा कोटा दिला नाही. डिचोली मतदार संघातील ज्या व्यक्तींना नोकऱ्या द्याव्यात, अशी शिफारस पाटणेकर यांनी केली होती, त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत. यामुळे पाटणेकर यांचे काही समर्थक नाऊमेद झाले.

मुख्यमंत्री सावंत तसेच भाजप संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने काल नरेश सावळ यांच्याशी चर्चा केली. मात्र, सावळ यांनी आपण मगो पक्ष सोडून कुठेच जाणार नाही, असे भाजप नेत्यांना सांगितल्याची माहिती मिळाली. सावळ हे मगोपचे उमेदवार आहेत. यानंतर सायंकाळी भाजपच्या नेतृत्वाकडून डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली गेली. शेट्ये यांनी ऑफर स्वीकारलेली नाही. शेट्ये यांनी अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार सुरु केला आहे. शेट्ये हे अपक्ष असूनही प्रबळ मानले जातात. भाजपचे तिकीट वाटप दोन दिवसात जाहीर होईल. यात डिचोलीविषयी काय निर्णय होतो, हे जाणून घेण्यास कार्यकर्ते इच्छुक आहेत.

...तर शिल्पाचा मार्ग मोकळा 

दरम्यान,  रात्री उशिरा डॉ. शेट्ये यांनी आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शेट्ये यांनी अपक्षच लढावे असे त्यावेळी ठरले. यामुळे  शिल्पा नाईक यांना डिचोलीत भाजपचे तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, असे भाजपमधील एका गटाकडून मानले जात आहे.
 

Web Title: goa election 2022 mgp leader rejected bjp offer search for candidates continues in bicholim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.