डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:56 PM2020-02-04T12:56:11+5:302020-02-04T13:00:34+5:30

गोव्याच्या विधानसभेमध्ये बोलताना मनोहर आजगावकर यांनी केले धक्कादायक विधान

Dr. Babasaheb Ambedkar wants a separate Dalitstan -Goa deputy chief minister | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले 

Next

पणजी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांसाठी स्वतंत्र दलितस्तान बनवण्याचा विचार होता. मात्र भारतातील जनता एकजूट राहिली, असे धक्कादायक विधान गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोबहर आजगावकर यांनी केले आहे.  लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा पारित करून घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव गोव्याच्या विधानसभेमध्ये सादर करण्यात आला होता. त्यावर बोलताना आजगावकर यांनी हे विधान केले. 



''फाळणीच्या वेळी मुस्लिम नव्याने निर्माण झालेल्या निघून गेले आणि पाकिस्तानचा जन्म झाला. मात्र हिंदुस्थान हिंदू राष्ट्र बनले नाही. आज काही लोक हिंदू राष्ट्राची चर्चा करतात. हिंदूंमध्ये कॅथॉलिक, हिंदू, मुस्लिम, दलित अशा सर्व समुदायातील लोकांचा समावेश होतो. दलितांसाठी स्वतंत्र दलितस्तान असेल, असे म्हटले होते. मात्र आज सर्वजण एकत्र आहेत.'' असे आजगावकर म्हणाले. 

मूकनायकाची शताब्दी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाक्षिक

आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूचा आरोप

प्रजासत्ताकाची चिंता!

दरम्यान, ''जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आंबेडकरांना आम्हाला संविधान दिले. ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम. शीख, ईसाई सर्वांचा समावेश आहे. हा देश महान असेल तर त्यामध्ये या सर्वांचे योगदान आहे,'' असेही त्यांनी पुढे सांगितले. मनोहर आजगावकर हे गोवा विधानसभेमध्ये पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पूर्वाश्रमीचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते असलेल्या आजगावकर यांनी काही काळापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती.  

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar wants a separate Dalitstan -Goa deputy chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.