जाहीरपणे भांडू नका, लोबो- आजगावकरांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 07:09 PM2020-05-07T19:09:56+5:302020-05-07T19:10:00+5:30

मुख्यमंत्री सावंत यांनी प्रथमच गुरुवारी लोबो व आजगावकर यांची एकत्र बैठक घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड आदी यावेळी उपस्थित होते.

Don't quarrel openly, Chief Minister's advice to Lobo-Ajgaonkar | जाहीरपणे भांडू नका, लोबो- आजगावकरांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

जाहीरपणे भांडू नका, लोबो- आजगावकरांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

googlenewsNext

पणजी : तुम्ही जाहीरपणो भांडू नका, वाद घालू नका असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी बैठकीवेळी दिला.


दोन्ही मंत्र्यांनी यापूर्वी जाहीरपणो पेडणो पोलिस निरीक्षकांच्या विषयावरून एकमेकांविरुद्ध दोषारोप केले होते. लोबो हे प्रथम पोलिसांच्या विषयावरून आक्रमक झाले होते व त्यांनी आजगावकर यांनाही लक्ष्य बनविले होते. त्याचे पडसाद पेडणो भाजपमध्येही उमटले होते. पेडणो पोलिसांनी रेती वाहतुकीचे ट्रक अडविल्यानंतर लोबो यांनी लाचखोरीचे आरोप केले होते. गृह खातेही लक्ष्य बनले होते.


मुख्यमंत्री सावंत यांनी प्रथमच गुरुवारी लोबो व आजगावकर यांची एकत्र बैठक घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड आदी यावेळी उपस्थित होते.तुम्ही अशा प्रकारे वाद घालणो योग्य नव्हे असे लोबो व आजगावकर यांना बैठकीत सांगितले गेले. लोबो यांच्याशी आपले शत्रूत्व नाही, आम्ही दोघेही एकाच भाजप कुटूंबाचे घटक आहोत, असे बैठकीनंतर आजगावकर यांनी पत्रकारांना सांगितले. लोबो यांनी मात्र आपला विषय हा पोलिस व गृह खात्याशीसंबंधित आहे असे सांगितले. आपण न्यायासाठी मुख्यमंत्र्यांशी संघर्ष करत आहे. पेडणो पोलिसांचा विषय आपण उपस्थित करतो म्हणून आजगावकरांनी नाराज होण्याचे कारण नाही असे मंत्री लोबो म्हणाले.
दरम्यान, भाजपच्या कोअर टीमची गुरुवारी सायंकाळी भाजप कार्यालयात बैठक झाली. लॉक डाऊनच्या काळात प्रथमच एकत्र येऊन भाजपने बैठक घेतली. पूर्वी काही बैठका ऑन लाईन पद्धतीने झाल्या होत्या. 

 

Web Title: Don't quarrel openly, Chief Minister's advice to Lobo-Ajgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.