Coronavirus : लॉकडाऊनच्या १२ दिवसांत गोव्यात अडकलेल्या २९९४ विदेशी पर्यटकांना पाठवले मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 08:28 PM2020-04-06T20:28:41+5:302020-04-06T20:29:19+5:30

लॉकडाऊनच्या १२ दिवसांच्या (२५ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत) काळात दाबोळी विमानतळावरून २९९४ विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असून यात ३१ चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहीती उपलब्ध झाली आहे.

Coronavirus : Within 12 days of lockdown, 2994 foreign tourists were stranded returns their country from Goa vrd | Coronavirus : लॉकडाऊनच्या १२ दिवसांत गोव्यात अडकलेल्या २९९४ विदेशी पर्यटकांना पाठवले मायदेशी

Coronavirus : लॉकडाऊनच्या १२ दिवसांत गोव्यात अडकलेल्या २९९४ विदेशी पर्यटकांना पाठवले मायदेशी

Next

वास्को: लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याकरिता दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने १२ दिवसात उत्तम पावले उचलून २९९४ विविध राष्ट्रातील पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवले. २५ मार्च ते ५ एप्रिल अशा १२ दिवसात दाबोळी विमानतळावर १८ खास विमाने आल्यानंतर यातून या विदेशी प्रवाशांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले आहे. ८ एप्रिल रोजी अन्य एक खास विमान दाबोळी विमानतळावर आल्यानंतर यातून गोव्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या युनियटेड किंगडमच्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार असल्याची माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.

लॉकडाऊननंतर गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना सुखरूपरीत्या त्यांच्या मायदेशी पाठवण्याकरिता दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने उत्तम अशी पावले उचलली. लॉकडाऊनच्या १२ दिवसांच्या (२५ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत) काळात दाबोळी विमानतळावरून २९९४ विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असून यात ३१ चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गोव्यातून १८ खास विमानाने मायदेशी पाठवण्यात आलेल्या प्रवाशात इस्त्राएल, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, रशिया, स्पेन, स्वित्झर्लंड, इटली, स्वीडन, कझाकिस्तान अशा विविध राष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या पर्यटकांना मायदेशी पाठवण्यात येत असताना कोरोना विषाणूची पसरण होऊ नये तसेच सर्वांना या विषाणूपासून दूर ठेवण्याकरिता दाबोळी विमानतळावर कडक सुरक्षेची पावले उचलण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आपल्या मायदेशी जाण्याकरिता विदेशी पर्यटक दाबोळी विमानतळावर आल्यानंतर विमानात पोहोचेपर्यंत योग्यरीत्या सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिग) पाळण्याची पावले विमानतळावर उचलण्याबरोबरच इतर विविध सुरक्षेची पावले उचलण्यात आल्याची माहिती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली.

लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या बहुतेक विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले असले तरी काही पर्यटक अजूनही गोव्यात असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी मागच्या १२ दिवसात विमानतळ प्राधिकरणाने विविध पावले उचलून २९९४ पर्यटकांना त्यांच्या राष्ट्रात पोहोचवल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे अन्य काही विदेशी पर्यटक अजून गोव्यात अडकून असल्याची माहिती गगन मलिक यांनी देऊन त्यांना सुद्धा मायदेशी पाठवण्यासाठी लवकरच उचित पावले उचलण्यात येणार असल्याचे मलिक यांनी माहितीत सांगितले. ८ एप्रिल रोजी अन्य एक खास विमान गोव्यात येणार असून या विमानातून गोव्यात अडकून असलेल्या युनियटेड किंगडम च्या काही पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार असल्याची माहिती संचालक गगन मलिक यांनी शेवटी दिली.

Web Title: Coronavirus : Within 12 days of lockdown, 2994 foreign tourists were stranded returns their country from Goa vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.