CoronaVirus News: दिलासादायक! गोव्यात 5 दिवसांत 940 जणांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:45 PM2020-07-29T13:45:13+5:302020-07-29T15:17:41+5:30

आरोग्य खात्याकडून रोज सायंकाळी बुलेटिन काढून ते प्रसार माध्यमांना पाठवले जाते.

CoronaVirus News: 940 people beat Corona in 5 days in Goa | CoronaVirus News: दिलासादायक! गोव्यात 5 दिवसांत 940 जणांनी केली कोरोनावर मात

CoronaVirus News: दिलासादायक! गोव्यात 5 दिवसांत 940 जणांनी केली कोरोनावर मात

googlenewsNext

पणजी : गेल्या पाच दिवसांतील सरकारी आकडेवारीनुसार एकूण 940 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले आहेत. याच पाच दिवसांत नवे 937 कोविडग्रस्त आढळले. नव्या रुग्णांच्या तुलनेत आजारातून बरे होणारे लोक जास्त आहेत. राज्याबाबतचे हे सकारात्मक चित्र समोर येत आहे. अनेक नव्या वाड्यांवर व नव्या इमारतींमध्ये कोविडग्रस्त आढळतात ही पणजी व परिसरासाठी तसेच राज्याच्या काही भागांसाठी चिंतेची गोष्ट ठरत आहे.

दि. 24 जुलै ते दि. 28 जुलै या कालावधीतील आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारीचा जर अभ्यास केला तर 140 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले हे स्पष्ट होते. दीडशे ते दोनशे रुग्ण रोज आजारातून बरे होत आहेत. ज्यांना कोविडची कोणतीच लक्षणो दिसत नाहीत, त्यांना काही दिवसांनंतर घरी पाठवले जाते. मात्र त्यांना पाठविण्यापूर्वी एकदा कोविड चाचणी करायला हवी असे अनेकांना वाटते. 24 रोजी 210 कोविडग्रस्त अजारातून बरे झाले. 26 रोजी 230 कोविडग्रस्त कोरोनामुक्त झाले. पाच दिवसांतील हा उच्चंक आहे. 

कोविडग्रस्त कोरोनावर मात करून आजारातून बरे होतात ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र त्याचबरोबर अनेक नवनव्या वाड्यांवर, नव्या इमारतींमध्ये व नव्या गावांमध्ये कोविडग्रस्त आढळत आहेत ही चिंतेची गोष्ट ठरते. ज्या व्यक्ती सुदृढ असतात, जास्त वृद्ध नसतात किंवा ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब वगैरे नसतो त्यांच्याकडून कोविडवर मात केली जाते. काही 80 ते 90 र्षे वयाचेही कोविडग्रस्त गेल्या काही दिवसांत आजारातून बरे झाले ही देखील सकारात्मक घटना आहे. वैद्यकीय उपचारांनाही याचे श्रेय जाते.

24 रोजी 190 नवे कोविडग्रस्त आढळले. 28 रोजी 168 आढळले. जेवढे कोविडग्रस्त आजारातून बरे होतात, तेवढेच नवे बाधित रुग्णही आढळतात. यामुळेच आता मोठय़ा स्टेडियमवर कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याची वेळ आली आहे. बांबोळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पाचशे खाटांचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी नुकतीच या प्रस्तावित केंद्राला भेट दिली व तेथील तयारीचा आढावा घेतला. गावांची नावे बुलेटिमध्ये यावीत. ज्या गावांमध्ये नवे कोविडग्रस्त आढळतात, त्या गावांची नावे सरकारी बुलेटिनमध्ये यायला हवीत असे मत व्यक्त होत आहे. 

आरोग्य खात्याकडून रोज सायंकाळी बुलेटिन काढून ते प्रसार माध्यमांना पाठवले जाते. त्यातील आकडेवारीवरून कोणत्या आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत किती रुग्ण आहेत हे कळून येते. मात्र कोणत्या गावात किती नवे रुग्ण आढळले हे कळून येत नाही. जर कोणत्या गावात नवे रुग्ण आढळले हे कळून आले तर संबंधित गावातील लोक आवश्यक ती काळजी घेऊ शकतील. अन्यथा आरोग्य केंद्राचेच नाव प्रसार माध्यमामध्ये येत असल्याने अफवा पसरविणा:यांचे फावते. कांदोळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 38 कोविडग्रस्त असल्याचे सरकारी बुलेटिनमध्ये दाखविले गेले आहे. मात्र या आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत अनेक गाव येतात, त्यामुळे कोणत्या गावात किती नवे रुग्ण कोणत्या दिवशी आढळले ते कधीच स्पष्ट होत नाही. आरोग्य खात्याच्या बुलेटिनमध्ये ही स्पष्टता येणो गरजेचे आहे. 

Web Title: CoronaVirus News: 940 people beat Corona in 5 days in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.