CoronaVirus News: गोव्यात कोरोनाचा पहिला बळी; ८५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:57 AM2020-06-22T08:57:35+5:302020-06-22T09:13:12+5:30

दीड महिन्यापूर्वी ग्रीन झोन असलेल्या गोव्यात सध्या ६८२ कोरोना रुग्ण

CoronaVirus goa registered first corona death after 85 year old died in Margao hospital old | CoronaVirus News: गोव्यात कोरोनाचा पहिला बळी; ८५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

CoronaVirus News: गोव्यात कोरोनाचा पहिला बळी; ८५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Next

पणजी : गोव्यात कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मोर्ले सत्तरी येथील ८५ वर्षे वयाच्या कोरोना बाधित रुग्णाचं मडगावातल्या कोविड रुग्णालयात सोमवारी पहाटे निधन झालं.

रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच आयसीयूत हलवण्यात आले होते. रविवारी त्याची प्रकृती आणखी बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांचे पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होते. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचं निधन झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली.




गोव्यात कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. दीड महिन्यापूर्वी ग्रीन झोन असलेल्या गोव्यात आज कोविड रुग्णालयात आणि कोविड निगा केंद्रात मिळून ६८२ रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत एकूण १३५ कोविड बाधित बरे झाले आहेत.

Web Title: CoronaVirus goa registered first corona death after 85 year old died in Margao hospital old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.