क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 07:33 IST2025-12-09T07:33:07+5:302025-12-09T07:33:50+5:30
अशा अधिकाऱ्यांना समन्स पाठवून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. परवाना प्रक्रियेत झालेल्या संभाव्य उल्लंघनाची तपासणी प्राधान्यक्रमाने केली जात आहे.

क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमधील भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य संशयित तथा क्बलचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी रविवारी पहाटे काही तासांतच भारतातून पळ काढला. दोघेही थायलंडला पळाल्याचे वृत्त आहे.
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
तपासादरम्यान ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून मिळालेल्या माहितीने पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. दोघांनी रविवारी, पहाटे फुकेतला प्रस्थान केल्याचे उघड झाले आहे. गोवा पोलिस सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी समन्वय साधून लुथरा बंधूंचा शोध घेत आहेत. गोवा पोलिसांनी या दोघांविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली आहे.
क्लबला परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
बर्च बाय रोमिओ लेन या क्लबला देण्यात आलेले विविध परवाने आणि परवाने देणारे अधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
अशा अधिकाऱ्यांना समन्स पाठवून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. परवाना प्रक्रियेत झालेल्या संभाव्य उल्लंघनाची तपासणी प्राधान्यक्रमाने केली जात आहे.
कोहली गजाआड
म्हापसा : हडफडे - बागा येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या अग्निकांडप्रकरणी हणजूण पोलिसांनी पाचव्या संशयितास अटक केली. क्लबचे कामकाज पाहणारा करुणसिंग कोहली (वय ४९, रा. पंजाब) असे त्याचे नाव आहे. तो क्लबच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मालकांच्या वतीने सांभाळत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
झारखंडमध्ये तीन जणांचे शव रवाना
गोवा नाइट क्लब प्रकरणात झारखंडमधील मरण पावलेल्या तीन कर्मचाऱ्यांचे मृतदेह सोमवारी रांची येथे आणण्यात आले. प्रदीप, विनोद महतो आणि मोहित मुंडा अशी या तिघांची नावे असून हे मृतदेह विशेष ॲम्ब्युलन्सने त्यांच्या गावी पाठवण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली आहे.