केंद्राकडे १५० कोटींचे प्रस्ताव

By Admin | Updated: January 16, 2015 01:25 IST2015-01-16T01:24:05+5:302015-01-16T01:25:06+5:30

पर्यटनमंत्र्यांची माहिती : ‘दाबोळी’वरील विमान पार्किंग समस्याही हवाई वाहतूकमंत्र्यांसमोर मांडली

Center proposes 150 crores | केंद्राकडे १५० कोटींचे प्रस्ताव

केंद्राकडे १५० कोटींचे प्रस्ताव

पणजी : पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी गुरुवारी केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा, तसेच हवाई वाहतूकमंत्री गजपथी राजू यांची भेट घेतली. पर्यटन प्रकल्पाचे १५० कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव केंद्रासमोर ठेवण्यात आले असून ‘दाबोळी’वर विमानांच्या पार्किंगची जी समस्या आहे त्याचीही माहिती देण्यात आली. या वेळी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच नौदलाचे वरिष्ठ अधिकारीही
उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ पर्यटन प्रकल्प होऊ घातले आहेत, त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्रीय मंत्र्यांना या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. येत्या मार्चमध्ये मंत्री डॉ. शर्मा यांना गोवा भेटीचे निमंत्रण देण्यात आले असून सांतामोनिका जेटीसमोरील मल्टिपार्किंग इमारत तसेच अन्य
पर्यटन वास्तूंचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल
हेही पर्यटनमंत्र्यांबरोबर गेले होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Center proposes 150 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.