मडगावची कार्निव्हल मिरवणूक आता रवींद्र भवन मार्गेच, मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 08:34 PM2020-02-21T20:34:58+5:302020-02-21T20:35:16+5:30

शुक्रवारी न्या. महेश सोनक व न्या. नूतन सरदेसाई यांच्या द्विसदस्यीय पीठाने मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच असल्याचे स्पष्ट करीत ही याचिका निकाली काढली.

Carnival procession of Madgaon is now through Ravindra Bhavan, the authority to decide the route | मडगावची कार्निव्हल मिरवणूक आता रवींद्र भवन मार्गेच, मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच 

मडगावची कार्निव्हल मिरवणूक आता रवींद्र भवन मार्गेच, मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच 

Next

मडगाव: मिरवणूक रस्त्यांवरुन राजकीय वाद निर्माण झालेली मडगावची कार्निव्हल मिरवणूक आता रवींद्र भवन मार्गेच होणार हे स्पष्ट झाले असून मिरवणुकीचा मार्ग पालिकेने ठरवायचा असतो, तो ठरवायचा आयोजन समितीला कुणी अधिकार दिला असा अभिप्राय व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठाने पालिकेने ठरविलेल्या रवींद्र भवन मार्गालाच हिरवा कंदील शेवटी शुक्रवारी दाखविला.

मडगाव पालिकेने पालिका बैठकीत ही मिरवणूक रवींद्र भवन मार्गे आयोजीत करण्याचा ठराव घेतला होता असे असतानाही आयोजन समितीचे अध्यक्ष आथरूर डिसिल्वा यांनी ही मिरवणूक जुन्या म्हणजे हॉस्पिसियो मार्गाने काढली जाईल असे सांगितले होते. या निर्णयाविरोधात मुरिडा फातोर्डा येथील एका नागरिकाने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. शुक्रवारी न्या. महेश सोनक व न्या. नूतन सरदेसाई यांच्या द्विसदस्यीय पीठाने मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच असल्याचे स्पष्ट करीत ही याचिका निकाली काढली. या मिरवणूक मार्गासंदर्भात आता जिल्हा प्रशासनाला न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणो निर्णय घ्यावा लागणार आहे.

अर्जदाराच्यावतीने माजी अॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद  लवंदे यांनी बाजू मांडली होती. न्यायालयात ही याचिका दाखल झालेली असतानाही आयोजन समितीने शुक्रवारी मडगाव नगरपालिकेसमोर व्यासपीठही उभारले होते. एवढेच नव्हे तर जुने जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिकेजवळील वाहतूक बेटही कार्निव्हलसाठी सजविले होते. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाने आयोजकांच्या या सा-या उमेदीवर पाणी पडले असे म्हणावे लागेल.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्देशाचे शॅडो कौन्सिल या संघटनेने स्वागत केले असून फक्त कार्निव्हल मिरवणुकीसाठीच नव्हे तर शहरातील सगळ्याच मिरवणुकांसाठी हे निर्देश लागू व्हावेत अशी मागणी केली आहे. या संघटनेचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात अशा मिरवणुकासाठी पर्यायी व्यवस्था प्रशासनाने तयार करावी अशी मागणी केली आहे.
कार्निव्हलची ही मिरवणूक शहरातून आणणो लोकांसाठी त्रासदायक ठरले असते.

विशेषत: हॉस्पिसियोत येणा-या रुग्णांसाठी हा निर्णय घातक ठरला असता. या मिरवणुकीमुळे आनाफोन्त गार्डन, सिमेंट्री जंक्शन आणि मोती डोंगरावरील होलीस्पिरीट जवळील मार्ग बंद केला जात असल्यामुळे रुग्णांना हॉस्पिसियोत आणण्यासाठी थेट आके येथे जाऊन पाजीफोंड मार्गे हॉस्पिसियो गाठावे लागले असते. यात जो वेळ वाया जातो तो रुग्णांसाठी मारक ठरु शकला असता याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्निव्हलसारख्या उत्सवाच्या मिरवणुकांकडे राजकीय दृष्टीकोनातून पहाणे अयोग्य असल्याचेही मत कुतिन्हो यांनी व्यक्त केले.

Web Title: Carnival procession of Madgaon is now through Ravindra Bhavan, the authority to decide the route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा