Shiv Sena Dasara Melava: “हे शिवसेनेचं बदललेलं स्वरुप, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:56 PM2021-10-14T16:56:34+5:302021-10-14T16:58:49+5:30

Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

bjp devendra fadnavis reaction on shiv sena dussehra melava in mumbai | Shiv Sena Dasara Melava: “हे शिवसेनेचं बदललेलं स्वरुप, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Shiv Sena Dasara Melava: “हे शिवसेनेचं बदललेलं स्वरुप, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

googlenewsNext
ठळक मुद्देहे शिवसेनेचं बदललेले स्वरुप असून, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतोठाकरे सरकारने जाहीर केलेले पॅकेज निव्वळ धूळफेकनवाब मलिक हे नैराश्यात आहेत

पणजी: कोरोनाची दुसरी लाट कायम असताना शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) होणार आहे. गतवर्षी मोजकी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आलेला दसरा मेळावा यंदाच्या वर्षी षण्मुखानंद सभागृहात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिवसेनेचे हे बदललेले स्वरुप असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येणार असे ऐकले. मला वाटते हे शिवसेनेचे बदलते स्वरुप आहे असे समजूया. कारण मजबुरी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत असल्याचे शिवसेना सांगत होती. आता हा प्रयत्न अधिक घट्ट होण्यासाठी असू शकतो, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. फडणवीस सध्या गोवा दौऱ्यावर असून, तेथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

ठाकरे सरकारने जाहीर केलेले पॅकेज निव्वळ धूळफेक

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर झालेले पॅकेज म्हणजे धूळफेक आहे. मागे अकरा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. ते गेले कुठे, त्याचे पैसे कुणाला मिळाले, अशी विचारणा करत या पॅकेजमधील कुठल्या जिल्ह्याला किती पैसे मिळणार आहेत याचीही माहिती नाही. हे सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजना बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. बांधावर जाऊन दिलेले आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना काही देईल, असे वाटत नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले हे केवळ राजकारणासाठी आहे. त्यापलिकडे त्यात वेगळे काही नाही. तसेच नवाब मलिक हे नैराश्यात आहेत. त्यांची निराशा व्यक्त करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गोवा दौरा सरकारी कार्यक्रम जोडून आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पक्षालाही मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. अमित शहा यांना मास्टर स्ट्रॅटेजिक मानले जाते. गोव्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा या दौऱ्यामुळे होणार आहे. गोवा आणि राज्यातील निवडणुकांसाठी एकत्रित मेहनत घ्यावी लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले. 
 

Web Title: bjp devendra fadnavis reaction on shiv sena dussehra melava in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.