नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 12:28 IST2025-12-07T12:27:31+5:302025-12-07T12:28:42+5:30
Birch by Romeo Lane Fire Video : हैदराबादहून गोव्यात आलेल्या फातिमा शेख या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री आग लागली तेव्हा क्लबच्या डान्स फ्लोअरवर (पहिला मजला) सुमारे १०० लोक उपस्थित होते.

नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील प्रसिद्ध 'Birch by Romeo Lane' या नाईट क्लबमध्ये मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अग्नितांडवात किमान २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत क्लबमधील कर्मचाऱ्यांसह तीन ते चार पर्यटकांचाही समावेश आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आग लागण्याचे कारण सिलेंडर स्फोट असल्याचे म्हटले असले तरी, घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने केलेल्या दाव्यामुळे आगीच्या कारणाबाबत नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हैदराबादहून गोव्यात आलेल्या फातिमा शेख या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री आग लागली तेव्हा क्लबच्या डान्स फ्लोअरवर (पहिला मजला) सुमारे १०० लोक उपस्थित होते.
"आम्ही डान्स करत असताना अचानक आग भडकली आणि धावपळ सुरू झाली. पोलिसांच्या दाव्याप्रमाणे किचनमध्ये नाही, तर डान्स फ्लोअरवरच आग लागण्यास सुरुवात झाली," असे फातिमा शेख यांनी सांगितले.
किचनमध्ये अडकले
आग लागल्यानंतर बचावासाठी लोक खाली धावले. गोंधळात अनेक पर्यटक आणि कर्मचाऱ्यांनी तळमजल्यावर असलेल्या किचनच्या दिशेने धाव घेतली, मात्र तो भाग व्हेंटिलेशन नसलेला 'डेड एंड' असल्याने तिथेच त्यांची कोंडी झाली, असे त्या म्हणाल्या.
BIG BREAKING: 23 people including 4 tourists died in fire at Birch by Romeo Lane nightclub in Arpora, Goa.
— Treeni (@TheTreeni) December 7, 2025
As per Fire Department and police, cylinder blast in kitchen caused blaze late night, 50 injured in hospital.
Probe on for safety violations. pic.twitter.com/WYoAi6PFuq
वेगाने आग पसरली...
क्लबचे बांधकाम 'पाम लीव्ह्स' सारख्या तात्पुरत्या आणि अत्यंत ज्वलनशील वस्तू वापरून केले होते, ज्यामुळे काही क्षणांतच संपूर्ण क्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मृतांपैकी बहुतेकांचा मृत्यू धुरामुळे श्वास गुदमरल्यामुळे झाला. तळमजल्यावरील किचनमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि पर्यटकांचा व्हेंटिलेशनअभावी श्वास कोंडला. क्लब नदीच्या बॅकवॉटर परिसरात होता आणि प्रवेशासाठी अतिशय अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळापासून तब्बल ४०० मीटर दूर थांबावे लागले. यामुळे बचावकार्य व आग विझवण्यात मोठा विलंब झाला.