Goa Nightclub Fire:शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:17 IST2025-12-07T09:17:09+5:302025-12-07T09:17:41+5:30
Birch by Romeo Goa Club Fire: 'Birch' बार शांत नदीकाठी होता. भारतातील पहिला 'आइसलँड बार' अशी या बारची ख्याती होती. यामुळे पर्यटकांची देखील याला पसंती होती.

Goa Nightclub Fire:शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
गोव्यातील आरपोरामधील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन क्लब'मध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला, यामुळे लागलेल्या आगीत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये चार पर्यटक असून १४ त्या क्लबचे कर्मचारी आहेत. उर्वरितांची अद्याप ओळख पटायची आहे. शनिवारची रात्र होती म्हणून या क्लबमध्ये पर्यटकांची संख्या कमी होती, हीच घटना जर शुक्रवारी रात्री घडली असती तर मृतांचा भयानक आकडा वाढला असता.
शुक्रवारी देशभरातून पर्यटक गोव्यात येत असतात. बहुतांश पर्यटक हे प्रेमीयुगुल, नुकतेच लग्न झालेले, मित्र-मैत्रिणी असे असतात. नाईट क्लबचा अनुभव घेण्यासाठी हे पर्यटक मोठ्या संख्येने पहिल्याच रात्री म्हणजे शुक्रवारी वेगवेगळ्या क्लबची वाट धरतात. शनिवारी ही संख्या निम्म्याहून कमी असते. 'बर्च बाय रोमिओ लेन क्लब'मध्ये घडलेली ही घटना शुक्रवारी घडली असती तर मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता होती.
भारतातील पहिला आइसलँड बार...
'Birch' बार शांत नदीकाठी होता. भारतातील पहिला 'आइसलँड बार' अशी या बारची ख्याती होती. यामुळे पर्यटकांची देखील याला पसंती होती. प्रत्येक जोडप्याकडून या बारमध्ये एन्ट्रीसाठी विकेंडला ४ हजारपर्यंत तर विकडेजला २०००-२५०० रुपयांपर्यंत घेतले जात होते.
नाताळ, थर्टी फर्स्टच्या तोंडावर दुर्घटना...
गोव्यातील अनेक नाईट क्लबमध्ये नाताळची, सरत्या वर्षाच्या निरोपाची मोठी तयारी केली जात आहे. यामुळे इंटेरिअर बदलणे, आवाजाचा गोंगाट बाहेर जाऊ नय़े म्हणून हे क्लब तेवढेच बंदिस्त केलेले आहेत. यामुळे अशी दुर्घटना घडली तर पर्यटकांसाठी हे प्रकार जिवघेणे ठरणार आहेत. नाताळ, थर्टीफर्स्टच्या तोंडावर बर्च बाय रोमिओ क्लबमध्ये ही दुर्घटना घडल्याने पर्यटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.