Goa Election 2022: केजरीवालांचा गोव्यासाठी ‘मेगा प्लान’; प्रमोद सावंतांसाठी ठरणार आव्हान?  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:14 PM2021-07-14T17:14:01+5:302021-07-14T17:17:42+5:30

Goa Election 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर असून, गोवावासीयांना केजरीवालांनी मोठी आश्वासने दिल्याचे समजते.

arvind kejriwal assures 300 units of free power if aap came to power in goa election 2022 | Goa Election 2022: केजरीवालांचा गोव्यासाठी ‘मेगा प्लान’; प्रमोद सावंतांसाठी ठरणार आव्हान?  

Goa Election 2022: केजरीवालांचा गोव्यासाठी ‘मेगा प्लान’; प्रमोद सावंतांसाठी ठरणार आव्हान?  

Next
ठळक मुद्देआगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल गोव्यात गोव्यातील जनतेला आम आदमी पक्षाची चार आश्वासनेमी तुम्हाला शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळतो - केजरीवाल

पणजी: पुढील वर्षी देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा यांसारख्या राज्यांचा समावेश आहे. या विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर असून, गोवावासीयांना केजरीवालांनी मोठी आश्वासने दिल्याचे समजते. (arvind kejriwal assures 300 units of free power if aap came to power in goa election 2022)

गोव्यात असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांना संबोधित करत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोवावासीयांना मोफत वीजेची ग्वाही दिली आहे. गोव्यात २०२२ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास ३०० यूनिट वीज मोफत देण्याची घोषणी केजरीवाल यांनी केली आहे. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी भाजपवर टीकाही केली. 

“RSS ने हिंदुराष्ट्र संकल्पना मांडत मतांसाठी धार्मिक विभाजन केलं, मग आता...”: संजय राऊत

गोव्यातील जनतेला आम आदमी पक्षाची चार आश्वासने

गोवा सुदंर असले, तरी येथील राजकारण खराब आहे. भाजप आणि काँग्रेसने मिळून जनतेची फसवणूक केली आहे. आमचे सरकार गोव्यात आले, तर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३०० यूनिट वीज मोफत दिली जाईल. विजेची जुनी बिले माफ केली जातील. त्याचबरोबर २४ तास वीज उपलब्ध असणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोफत वीज मिळेल. मी तुम्हाला शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळतो, असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.

गोव्यात साळावली, पंचवाडी, आमठाणे धरणे तुडुंब भरली 

दरम्यान, मला आनंद आहे की, आम आदमी पक्ष चांगले काम करत आहे. विरोधकही आमच्या पक्षाची स्तुती करत आहेत, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलणे टाळले. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे प्रमुख दीपक ढवळीकर आणि त्यांचा भाऊ सुदिन ढवळीकर यांनी अरविंद केजरीवाल यांची रिसॉर्टमध्ये भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: arvind kejriwal assures 300 units of free power if aap came to power in goa election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.