गोव्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा; काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:26 PM2020-04-09T16:26:44+5:302020-04-09T16:27:46+5:30

स्मारकासारखे प्रस्ताव गुंडाळून ठेवण्याचीदेखील मागणी

amid coronavirus congress demands white paper from bjp government | गोव्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा; काँग्रेसची मागणी

गोव्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा; काँग्रेसची मागणी

Next

मडगाव- गोवा सरकार सध्या आर्थिक अडचणीत असल्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी मान्य केल्याने काॅंग्रेस पक्षाने नोव्हेंबर २०१९ मध्ये भाकीत खरे ठरले आहे. गोव्यात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने राज्याला कर्जबाजारी करुन राज्यात आर्थिक आणीबाणी लादली व त्यामुळेच आज गोवा दिवाळखोर झाला आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला असून राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल श्वेतपत्रिका जारी करा अशी मागणी केली आहे

मुख्यमंत्र्यानी ताबडतोब पुढील तीन वर्षांसाठी खर्च कपात जाहिर करावी. विदेश दौरे, प्रमोशनल इव्हेंट व कोट्यावदी रुपयांची स्मारके बांधण्याचे सर्व प्रस्ताव बंद करुन जनतेला मदतीचा हात देण्यासाठी पाऊले उचलावीत. मुख्यमंत्र्यानी राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी श्वेतपत्रिका काढून आज सरकारकडे आपत्कालीन संकटाचा सामना करण्यासाठी किती निधी उपलब्ध आहे, मुख्यमंत्री सहायता निधीत किती रक्कम शिल्लक आहे, सरकारची तसेच विविध सरकारी आस्थापनांची आज किती रकमेची देणी आहेत हे जाहीर करणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आता कोरोनासाठीचा लाॅकडाऊन वाढवण्याची वेळ आली तर सरकारने कोणती तयारी केली आहे याची माहिती लोकांना देणे गरजेचे आहे. आज मोटर सायकल पायलट, गाडेवाले, रस्सा ॲामलेट व इतर खाद्यपदार्थ विकणारे गाडे तसेच दिवसाच्या मिळकतीवर आपला संसार चालविणारे लहान व्यापारी व व्यावयायिक यांच्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी कोणती योजना आखली आहे हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. 

लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या छोटे उद्योग व व्यावसायीकांना सरकारची आर्थिक परिस्थिती ठीक नाही असे सांगून सरकार मदत करु शकत नाही असे विधान करुन मुख्यमंत्र्यानी हात वर करणे धक्कादायक व दुर्दैवी आहे. आम्ही जेव्हा सत्यपरिस्थीती समोर ठेऊन मुख्यमंत्र्याना वायफळ खर्च कमी करण्याचा सल्ला देत होतो तेव्हा ते विरोधकांची खिल्ली उडवित होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: amid coronavirus congress demands white paper from bjp government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.