ट्रेलर वाहनाच्या चाकाखाली सापडून ६० वर्षीय महीला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 07:27 PM2020-02-08T19:27:48+5:302020-02-08T19:27:51+5:30

दक्षिण गोव्यातील वेर्णा येथील ‘टायटन जंक्शन’ समोर ट्रेलर या अवजड वाहनाबरोबर झालेल्या अपघातात ६० वर्षीय डोनेता डी’सोझा या वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

A 60 year-old woman was found dead under the wheels of a trailer vehicle | ट्रेलर वाहनाच्या चाकाखाली सापडून ६० वर्षीय महीला जागीच ठार

ट्रेलर वाहनाच्या चाकाखाली सापडून ६० वर्षीय महीला जागीच ठार

Next

वास्को: पतीसहीत दुचाकीने जात असताना दक्षिण गोव्यातील वेर्णा येथील ‘टायटन जंक्शन’ समोर ट्रेलर या अवजड वाहनाबरोबर झालेल्या अपघातात ६० वर्षीय डोनेता डी’सोझा या वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी अंत झाला. जॉन डी’सोझा त्याची पत्नी डोनेता हीला घेऊन एक्टिव्हा दुचाकीने जात असताना याच मार्गावरून जात असलेल्या ट्रेलर वाहनाला (दोन्ही वाहने एकाच दिशेने जात होती) बाजूने त्यांच्या दुचाकीची धडक बसल्याने डोनेता रस्त्यावर पडल्यानंतर ट्रेलर वाहनाचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि. ८) सकाळी ११.१० च्या सुमारास सदर अपघात घडला. कुठ्ठाळी चर्च मार्ग परिसरात राहणारा ६३ वर्षीय जॉन डी’सोझा त्याची पत्नी डोनेता डी’सोझा हीला घेऊन एक्टीव्हा दुचाकीने (क्र: जीए ०६ व्हाय १९३७) वेर्णाच्या दिशेने जात होता. दुचाकीने जाताना जेव्हा जॉन व त्याची पत्नी वेर्णा येथील ‘टायटन जंक्शन’ समोर पोचली तेव्हा याच मार्गाने जाणाऱ्या ट्रेलर (क्र: एमपी ३९ एच ३२८४) या अवजड वाहनाला त्यांच्या दुचाकीची बाजूने धडक बसल्याने जॉन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत पडल्याने तो किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला, मात्र डोनेता रस्त्यावर पडल्याने ट्रेलरचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. वेर्णा पोलिसांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन अपघाताचा तसेच मृत डोनेता हिच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात पाठवून दिला.

अपघातात सापडलेल्या ट्रेलर वाहनाचा चालक रतनलाल सूतार (वय ५८, उदयपूर - राजस्थान) यास वेर्णा पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. वेर्णा महामार्गावर शनिवारी सकाळी डोनेता डी’सोझा हीचा असा दुर्देवी अंत झाल्याने तिच्या कुटूंबावर तसेच शेजा-यात दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. डोनेता हीचा पती जॉन या अपघातातून किरकोळ जखमा होऊन सुखरूप बचावल्याची माहिती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रियंका नाईक अधिक तपास करीत आहे.

Web Title: A 60 year-old woman was found dead under the wheels of a trailer vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.