यावर्षीच्या अतिवृष्टीने १७९७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:46 AM2019-08-20T00:46:24+5:302019-08-20T00:46:46+5:30

यावर्षी १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार ७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम अजुनही सुरूच आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

This year's rainfall has hit 499 homes | यावर्षीच्या अतिवृष्टीने १७९७ घरांची पडझड

यावर्षीच्या अतिवृष्टीने १७९७ घरांची पडझड

Next
ठळक मुद्देमदत वितरण सुरू : आठ व्यक्तींसह ६७ जनावरांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षी १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार ७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम अजुनही सुरूच आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात सुमारे १३०० मिमी पाऊस पडतो. जुलै महिन्याच्या २४ तारखेपासून जिल्ह्यात संतत पावसाला सुरूवात झाली होती. जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस कोसळत होता. यादरम्यान अनेक तालुक्यात वारंवार अतिवृष्टी झाली. ग्रामीण भागात मातीची कच्ची घरे मोठ्या प्रमाणात आहेत. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका त्या कच्च्या घरांना बसला. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे गावात पाणी शिरले होते. त्यामुळे घरांची पडझड झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २० पक्की व कच्ची घरे पूर्णत: कोसळली आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १५, आरमोरी तालुक्यात ४ व सिरोंचा तालुक्यातील एका घराचा समावेश आहे. २२ पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १५ घरे सिरोंचा तालुक्यातील आहेत. अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे १ हजार ५३६ कच्ची घरे अंशत: पडझड झाली आहेत. तसेच ११६ गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. पुरात २४ मोठी दुधाळ जनावरे, सात लहान दुधाळ जनावरे, ओढ काम करणारी ३६ मोठी जनावरे वाहून गेली आहेत.
पुराने घेतला आठ जणांचा बळी
जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांवर ठेंगणे पूल आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर या पुलांवरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. दैनंदिन कामासाठी काही नागरिक धोका पत्करून पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांढतात. यामुळे पुरात वाहून जाण्याच्या घटना घडतात. १५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील आठ नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा व भामरागड तालुक्यातील प्रत्येकी एक व तर अहेरी व आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी दोघांना प्राण गमवावे लागले.
एक कोटी रुपयांची मदत प्राप्त
राज्य शासनाच्या महसूल विभागाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ८ आॅगस्ट रोजी शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित नागरिकांना मदत म्हणून एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले. सदर रक्कम तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे पंचनामे झाले आहेत, त्यांना आर्थिक मदतसुध्दा दिली जात आहे.

Web Title: This year's rainfall has hit 499 homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस