स्त्री परिचरांचे मानधन वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:21 AM2019-02-18T00:21:26+5:302019-02-18T00:23:41+5:30

अंशकालीन स्त्री परिचरांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. सदर मानधन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासन गंभीर आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी केले.

Women's charity values will increase | स्त्री परिचरांचे मानधन वाढणार

स्त्री परिचरांचे मानधन वाढणार

Next
ठळक मुद्देखासदारांचे आश्वासन : जिल्हा परिषद अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अंशकालीन स्त्री परिचरांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. सदर मानधन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासन गंभीर आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी केले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंशकालीन स्त्री परिचर संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, सहसचिव मधुकर सोनुने, सरचिटणीस सुरेश खाडे, वर्धा जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डी. एम. गौरकर, मधुकर सोनुने, नरेंद्र भागडकर, विनय ढगे, राम जुमळे, सुनील महतकर, प्रभाकर सुरतकर, सुरेश खाडे, निलेश साठवणे, अमित कोपलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचे महत्त्वाचे काम स्त्री परिचर करतात, तरीही त्यांना अंशकालीन समजले जाते. हा त्यांच्यावर होत असलेला फार मोठा अन्याय आहे. दिवाळी भेट देण्याबाबत आपण सकारात्मक आहोत, असे आश्वासन जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाºयांनीही मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, कार्यकारी अध्यक्ष निलू वानखेडे, कार्याध्यक्ष आशानंद सहारे, कोषाध्यक्ष अनिल मंगर, सरचिटणीस विनोद सोनकुसरे, महिला जिल्हा प्रमुख रेखा सहारे, उषा मडावी, कविता चंदनखेडे, करूणा पवार, भूमिका सेलोटे, जी. वाय. पाल, डी. टी. आंबोणे, के. एस. पेंदाम, हरीदास कोटरंगे, एस. जी फाटे, लिना मडावी, शामलाल नागुला, अनिता जाधव, भुमे, व्ही. ए. फुलझेले, आर. व्ही. सोनटक्के, ए. एस. रणदिवे, एम. एस. हुलके, डी. एन. सहारे, एन.एन. बसवा, अर्चना चौधरी, जया घुग्गुसकर, उर्मिा सोरते, पंचफुला लिंगे, सुरेखा केळझरकर, वैशाली शास्त्रकार, लक्ष्मी गावडे, संगमा खोब्रागडे, ज्योती दुर्गे, वच्छला मारबते, ज्योती बोरगमवार, जयश्री गोडबोले, उषा चौधरी, जयश्री गंगरस, दर्शना सुरपाम, पी. डी. मेश्राम, जया बोधनकर, जी. एस. हेडो, मालती शेडमाके, संध्या कसनवार, ज्योती बोरगमवार, शोभा गेडाम, एन. पी. नैताम, मधुसुदन बोदुवार, आनंद मोडक यांनी सहकार्य केले.

मुख्यमंत्र्यांसोबत २७ फेब्रुवारीला चर्चा
अंशकालीन स्त्री परिचरांना केवळ १२०० रुपये मानधन दिले जाते. वाढलेल्या महागाईत हे मानधन अतिशय कमी आहे. १९७२ मध्ये अंशकालीन स्त्री परिचराचे मासिक मानधन ५० रुपये व शिक्षकाचे वेतन ७२ रुपये होते. आज अंशकालीन स्त्री परिचराला केवळ मासिक १२०० रुपये मानधन मिळत आहे. तर शिक्षकाचे वेतन ६० हजार रुपयांवर गेले आहे. दोघांच्या वेतनातील तफावत लक्षात येते. अनेक वर्ष सेवा झाल्यानंतरही परिचरांना सुट्या मंजूर नाही. किमान वेतन कायद्याची पायमल्ली होत आहे. अंशकालीन स्त्री परिचरांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे २७ फेब्रुवारी रोजी बैठक लावून देण्याचे आश्वासन आमदार डॉ. होळी यांनी दिले. त्याचबरोबर मानधन वाढीचा मुद्दा आपणही रेटून धरू, असे आश्वासन डॉ. होळी यांनी दिले. त्यामुळे मानधन वाढीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Web Title: Women's charity values will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.