आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:18 AM2019-08-10T00:18:53+5:302019-08-10T00:19:17+5:30

भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला व नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. हे अधिकार, हक्क व आरक्षण कायम राहतील. आदिवासी समाजावर कदापी अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Will not allow injustice to tribal society | आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची ग्वाही : जागतिक आदिवासी दिन समारंभ उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला व नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. हे अधिकार, हक्क व आरक्षण कायम राहतील. आदिवासी समाजावर कदापी अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन व विविध आदिवासी संघटनांच्या वतीने स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात शुक्रवारी आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष घनश्याम मडावी होते. प्रमुख अथिती म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा परिषद सदस्य रंजिता कोडापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, आर. एल. पुराम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, आॅल इंडिया आदिवासी फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष माधव गावळ, जिल्हा अध्यक्ष भरत येरमे, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शालिक उसेंडी, नगर सेवक गुलाब मडावी, पं. सं. सदस्य मारोतराव इचोडकर, सुषमा मेश्राम, हलबा- हलबी समाज संघटनेचे अध्यक्ष शालिक मानकर, आदिवासी परधान जमात पंचायतचे जिल्हा अध्यक्ष विलास कोडाप, सहायक गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे, कुसूम अलाम, भागवत कुमरे, डॉ. किरण मडावी, वसंत कुलसंगे, प्रकाश गेडाम, सदानंद ताराम, आनंद कंगाले, जयश्री येरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे असून अमूल्य आहे, असे महानथोर पुरूषांनी सांगितले. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून येथील आदिवासी नागरिकांचा विकास व्हावा, यासाठी आपण गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठ निर्माण केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून गडचिरोली हे ज्ञानाचे मोठे केंद्र व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे व तसे प्रयत्न सुरू आहेत. जल, जंगल, जमीन व पर्यावरणाचे रक्षण करणारे चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव सात्विक व प्रामाणिक आहेत व त्यांच्यात शौर्य आहे. त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांचा विकास व्हावा, यासाठी आपण मिशन शौर्य अभियान सुरू केले. यात दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी सहभागी होणार आहेत. आदिवासींच्या विकासासाठी रोजगार महत्त्वाचा आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोेंदिया हे तीन जिल्हे मिळून रोजगार निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांची योजना तयार केली जात आहे, असे नामदार मुनगंटीवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अगोदर इंदिरा गांधी चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक सदानंद ताराम तर संचालन वनिश्याम येरमे व वर्षा राजगडकर यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळालेल्या व इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी अमर विठ्ठल नैताम, लोकेश चबनलाल मारर्गिया, सौरभ घोडाम, नागेश दिलीप मरस्कोल्हे, संस्कृति अरूण गेडाम, अंजली रमेश नरोटे, आचल कन्नाके, पुनम नामदेव उसेंडी, वैशाली बंडू नरोटे, विशाल शांताराम पुडो, कृतिका पिंताबर गेडाम, आलिशा सुरेश कोवासे, कामिनी पेंदाम, धनंजय घनश्याम मडावी आदि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आदिवासींसाठी सभागृह बांधणार
आदिवासींची संस्कृती व विचाराचे मंथन होऊन विकासाला वाव मिळण्यासाठी गडचिरोली येथे सभागृह असणे आवश्यक आहे. आदिवासी समाज बांधवांनी गडचिरोलीत जागा उपलब्ध करून द्यावी. आपण शासनाच्या वतीने येथे सुसज्ज सभागृह बांधून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
कार्यक्रमात यांचा झाला सत्कार
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये विट्ठलराव नैताम, माणिराव तोडासे, दादाजी गेडाम, पांडुरंग मेश्राम, कवडूजी येरमे, तुळशिराम आलाम तर सामाजिक व अन्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आंशी वासुदेव मडकाम, हरीश सिडाम, गुलाब मडावी यांच्या शाल व स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Will not allow injustice to tribal society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.