बाहेर फिरणाऱ्यांच्या गळ्यात झळकले ‘मै गधा हू’चे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:29+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे, तर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र कोरची येथील काही युवक कारण नसतानाही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे.

 The vibe of 'Mai Donkey Hoo' flashed in the throats of the outdoors | बाहेर फिरणाऱ्यांच्या गळ्यात झळकले ‘मै गधा हू’चे फलक

बाहेर फिरणाऱ्यांच्या गळ्यात झळकले ‘मै गधा हू’चे फलक

Next
ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन करणारे खजिल । कोरची पोलिसांची अनोखी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : काहीही कारण नसताना बाहेर फिरून कोरची येथील काही युवक संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी अशा युवकांना पकडून त्यांच्या हातात ‘मै गधा हूं, जो बाहर घुमने निकला था’ असा मजकूर लिहिलेले फलक देत आहेत. त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनोख्या कारवाईमुळे संबंधित लोकांचा चांगलेच खजिल व्हावे लागत आहे. पण याचा फायदा संचारबंदी पाळण्यासाठी होत असून इतर युवक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे, तर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र कोरची येथील काही युवक कारण नसतानाही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे.
अशा नागरिकांना पकडून त्यांच्या हातात ‘मै गधा हू, जो बाहर घुमने निकला था’ असा मजकूर लिहिलेले फलक दिले जात आहेत. थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना अशा पद्धतीने अद्दल घडवून संचारबंदी पाळण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना अनेक ठिकाणचे पोलीस चोप देण्यासोबत, उठबशा करायला लावणे, कोंबडा बनविणे आदी पद्धतीने अद्दल घडवित आहेत. मात्र कोरची पोलिसांनी स्थानिक नागरिकांना मारहाण न करता त्यांच्या गळ्यात फलक लटकवून त्याचे फोटो काढले जात असल्यामुळे हा प्रयोग पोलिसांचा हेतू पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.

Web Title:  The vibe of 'Mai Donkey Hoo' flashed in the throats of the outdoors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.