सावरगावजवळ गिट्टीचे दोन ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:27+5:30

नागपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात ट्रकने अवैध गिट्टी आणली जात असल्याची गोपनीय माहिती गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने एमएच ४०, एके ५६५६ व एमएच ४० एके २५०० या क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग करून ही वाहने गडचिरोली तालुक्यातील धानोरा मार्गावरील सावरगावजवळ पकडली.

Two truckloads of ballast seized near Savargaon | सावरगावजवळ गिट्टीचे दोन ट्रक जप्त

सावरगावजवळ गिट्टीचे दोन ट्रक जप्त

Next
ठळक मुद्देट्रॅक्टरवरही कारवाई । गडचिरोली तहसीलदारांच्या पथकाने पाठलाग करून पकडले वाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गिट्टीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक गडचिरोली तहसील कार्यालयाने जप्त केले. सदर कारवाई शनिवारी पहाटे महसूल विभागाच्या पथकाने गडचिरोली तालुक्यातील धानोरा मार्गावरील सावरगावजवळ केली.
नागपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात ट्रकने अवैध गिट्टी आणली जात असल्याची गोपनीय माहिती गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने एमएच ४०, एके ५६५६ व एमएच ४० एके २५०० या क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग करून ही वाहने गडचिरोली तालुक्यातील धानोरा मार्गावरील सावरगावजवळ पकडली. गिट्टीचा परवानाबाबत चालकाला विचारले असता त्यांच्याकडे परवाना आढळून आला नाही. त्यामुळे सदर ट्रक गडचिरोली तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. हे ट्रक भिवापूर येथील रूचित पंदीलवार यांच्या मालकीचे आहेत. प्रत्येक ट्रकवर २ लाख ६० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कारवाई गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या नेतृत्वात तलाठी महेश गेडाम, विनोद ढोरे, प्रफूल्ल चौधरी, संजय लाडवे, महेश चुणारकर यांनी केली.

रेतीचा ट्रॅक्टर जप्त
विहीरगाव येथील लोमेश मारोती वैरागडे यांच्या मालकीच्या एमएच ३३, एफ ४६६५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक केली जात होती. ट्रॅक्टर चालकाकडे रेतीचा परवाना आढळून आला नाही. सदर ट्रॅक्टरही जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Two truckloads of ballast seized near Savargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.