भामरागडचे दोन आदिवासी युवक होणार डॉक्टर; डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 09:02 PM2021-11-18T21:02:04+5:302021-11-18T21:02:36+5:30

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात असलेल्या नारगुंडा येथे राहणारे दोन युवक यंदा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. विपरित परिस्थितीत त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांचा आमटे दांपत्याकडून सत्कार करण्यात आला.

Two tribal youths from Bhamragad to become doctors; Dr. Greetings by Prakash and Manda Amte | भामरागडचे दोन आदिवासी युवक होणार डॉक्टर; डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते सत्कार

भामरागडचे दोन आदिवासी युवक होणार डॉक्टर; डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते सत्कार

Next

गडचिरोलीः नीट परीक्षेत या वर्षी उत्तीर्ण झालेल्या भामरागड तालुक्यातील नारगुंडा येथील रहिवासी सुरज पुंगाटी आणि लाहेरी येथील विजय ओक्सा यांना गुरुवारी लोक बिरादरी प्रकल्प येथे स्व.लक्ष्मीबाई आमटे ट्रस्ट च्या वतीने प्रत्येकी 11000 रुपयांचे बक्षीस ट्रस्ट चे ट्रस्टी डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते देण्यात आले.

सुरज हा हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी आहे. सुरजच्या यशात पुणे येथील LFU संस्थेच्या नीट प्रिपरेशन क्लासचा सिंहाचा वाटा आहे. विजय ओक्सा हा भामरागड येथील मॉडेल स्कूलचा विद्यार्थी आहे. 'हम किसीसे कम नही' हे सिद्ध करत या दोघांनी प्रचंड मेहनतीने नीट परीक्षा पास केली. लोक बिरादरी प्रकल्पामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

लवकरच यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल अशी आशा करूया. लवकरच ते डॉक्टर होतील. आणि समाजाची सेवा करतील. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Two tribal youths from Bhamragad to become doctors; Dr. Greetings by Prakash and Manda Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.