बोदलीजवळच्या जंगलात वाघाचा इसमावर जबर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 05:00 AM2021-10-17T05:00:00+5:302021-10-17T05:00:33+5:30

लालाजी यांच्यासह बोदली गावातील ७ इसम बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात (कक्ष क्रमांक १७९) सिंधी आणण्यासाठी गेले होते. १२.३० वाजताच्या सुमारास लालाजी यांच्या आरडाओरड करण्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे बाकी लोकांनीही आरडाओरड करत तिकडे धाव घेतल्याने वाघाने तेथून जंगलात धूम ठोकली. पण वाघाच्या तावडीतून सुटलेल्या लालाजी यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

A tiger attacks Isma in the forest near Bodali | बोदलीजवळच्या जंगलात वाघाचा इसमावर जबर हल्ला

बोदलीजवळच्या जंगलात वाघाचा इसमावर जबर हल्ला

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोदली बिटमध्ये सिंधी कापण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात त्या इसमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. लालाजी मारोती मोहुर्ले (५० वर्ष) असे जखमी इसमाचे नाव आहे. 
प्राप्त माहितीनुसार, लालाजी यांच्यासह बोदली गावातील ७ इसम बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात (कक्ष क्रमांक १७९) सिंधी आणण्यासाठी गेले होते. १२.३० वाजताच्या सुमारास लालाजी यांच्या आरडाओरड करण्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे बाकी लोकांनीही आरडाओरड करत तिकडे धाव घेतल्याने वाघाने तेथून जंगलात धूम ठोकली. पण वाघाच्या तावडीतून सुटलेल्या लालाजी यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी शि.र. यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक (रोहयो) सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्र सहायक श्रीकांत नवघरे, वनपाल वैभव रामणे, काळे, वाघ नियंत्रण पथकाचे वनपाल किरमे, बिट वनरक्षक भसारकर, तसेच राजू कोडापे, धर्मराव दुर्गमवार, गौरव हेमके, साई टेकाम आदी वनरक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती जाणून घेतली. घटनास्थळी केलेल्या पाहणीत वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. अधिक चौकशी उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी आणि सहायक वनसंरक्षक भडके यांच्या मार्गदर्शनात आरएफओ पेंदाम करीत आहेत.

सूचनांकडे केले दुर्लक्ष, बसून असल्यानेच हल्ला
वाघांचे हल्ले टाळण्यासाठी वनविभागाकडून वाघ सनियंत्रण पथकामार्फत विविध सूचना केल्या आहेत. जंगलात जाऊ नये अशी दवंडीही दिली आहे. पिपल फॉर एन्वारमेंट अँड ॲनिमल या संस्थेने सिंधी तोडण्यासाठी जात असलेल्या नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबतही जनजागृती केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे जखमी लालाजी हे बसून सिंधी तोडत होते. त्यामुळेच वाघाने त्यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत केल्याचे या घटनेत आढळून आले.

 

Web Title: A tiger attacks Isma in the forest near Bodali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ