ना रस्ता बनला, ना लोहखाणीचे काम सुरू झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:23+5:30

गील वर्षी १६ जानेवारी २०१९ ला सकाळी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून चार कि.मी अंतरावर गुरूपल्ली ते कर्रेम यादरम्यान एटापल्लीवरु न आलापल्ली जाणारी बस व आलापल्लीवरून सुरजागडकडे लोहदगड आणण्यासाठी जाणारा ट्रक यांच्यात धडक होऊन बसमधील चार जण जागीच ठार झाले होते. यामध्ये दोन महिलांसह एक पुरु ष कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश होता. अनेक जण जखमीही झाले होते.

There was no road, no iron works started | ना रस्ता बनला, ना लोहखाणीचे काम सुरू झाले

ना रस्ता बनला, ना लोहखाणीचे काम सुरू झाले

Next
ठळक मुद्देगुरूपल्ली अपघाताची वर्षपूर्ती : बेरोजगारीने होरपळतोय तालुका, पालकमंत्र्यांचे आश्वासनही विरले हवेत

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : लोहदगड वाहतुकीकरीता येणारा ट्रक आणि एसटी बसच्या गुरूपल्लीजवळ झालेल्या अपघाताला गुरूवारी (दि.१६) एक वर्ष पूर्ण होत आहे. या अपघातात चौघे जण जागीच ठार झाल्याने एटापल्लीत मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात अनेक मागण्या होत्या. त्यात एटापल्ली-आलापल्ली या मार्गाचे नुतनीकरण करण्याची मुख्य मागणी होती. या रस्ताचे काम आठ दिवसात काम केले जाईल, असे आश्वासन तत्कालीन पालकमत्र्यांनी दिले होती. परंतु एक वर्ष लोटूनही ना रस्ताचे काम सुरू झाले, ना सुरजागड पहाडीवरील लोहखाणीचे काम सुरू झाले. बेरोजगारीने होरपळत असलेल्या या तालुक्यासाठी ही बाब चांगलीच जिव्हारी लागली आहे.
मागील वर्षी १६ जानेवारी २०१९ ला सकाळी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून चार कि.मी अंतरावर गुरूपल्ली ते कर्रेम यादरम्यान एटापल्लीवरु न आलापल्ली जाणारी बस व आलापल्लीवरून सुरजागडकडे लोहदगड आणण्यासाठी जाणारा ट्रक यांच्यात धडक होऊन बसमधील चार जण जागीच ठार झाले होते. यामध्ये दोन महिलांसह एक पुरु ष कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश होता. अनेक जण जखमीही झाले होते. त्यातील एका मुलीचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला.
हा अपघात सुरजागड लोहपहाडीवरील दगड वाहतुकीच्या ट्रकमुळे झाल्याने अपघातानंतर लगेच नागरीकांनी आक्र मक होवुन कायदा हातात घेत लोहदगड वाहतुकीसाठी जाणारे तब्बल १५ ट्रक जाळले तर अनेक ट्रकच्या काचा फोडल्या. अपघातात ठार झालेले एटापल्ली येथील वनपाल अंबादे यांचा मृतदेह एटापल्ली वन तपासणी नाक्याजवळ ठेवुन दोन दिवस विविध मागण्यांकरीता आंदोलन झाले. या आंदोलनाला तत्कालीन माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम, दीपक आत्राम यांनी पाठीबा दिला. तसेच तत्कालीन पालकमंत्री अब्रिशराव आत्राम यांनी आंदोलन मंडपात भेट देवुन आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यासह ८ दिवसात एटापल्ली-आलापल्ली रस्त्याचे काम सुरु करू, असेही आश्वासन दिले. मात्र तब्बल एक वर्ष लोटले तरी त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. नक्षलवाद्यांनी तीन वर्षापूर्वी ८० वाहने जाळल्यानंतर अवघ्या महिनाभरात पोलिसांनी हिंमत देत पुन्हा काम सुरू केले होते, पण यावेळी वर्ष लोटले तरी काम ठप्प आहे. १६ आॅगस्ट २०१९ पासून एटापल्ली येथे पुन्हा आठ दिवस आंदोलन झाले. एटापल्ली-आलापल्ली नवीन रस्त्याचे काम आणि सायन्स कॉलेज सुरू करण्याची मागणी लावून धरण्यात आली. त्या आंदोलनाला पाच महिने लोटले, पण एकही मागणी पूर्ण झालेली नाही.

१५ दिवसात कामाला सुरूवात- धर्मरावबाबा
दि. १३ जानेवारीला एटापल्ली येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुकास्तरीय बाल क्रीडा कार्यक्र मात बोलताना एटापल्ली-आलापल्ली मार्गाचे काम १५ दिवसानंतर सुरु होणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळेत सायन्स शाखा सुरु करण्याकरीता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र सुरजागड पहाडीवरी लोहखाणीच्या कामाबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.

सुरजागड लोह प्रकल्पाच्या कामाला नक्षल्यांचा विरोध असल्याने लॉयड्स मेटल्स कंपनीचे नक्षलवाद्यांनी बरेच नुकसान केले. त्यानंतर या कामाला पोलीस संरक्षण देण्यात आले. मात्र गुरूपल्लीच्या अपघातापासून हे काम पुन्हा बंद झाले. काही जण हा प्रकल्पच नको म्हणतात, तर दुसरीकडे तालुक्यातील बेरोजगार प्रकल्पाचे काम सुरू करण्याची मागणी करत आहेत.

Web Title: There was no road, no iron works started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात