ई-पास शिवाय आंतरजिल्हा वाहतूक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:42+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडचिरोली जिल्हाच्या हद्दीत प्रवेश व जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आले आहेत.

There is no inter-district transport without e-pass | ई-पास शिवाय आंतरजिल्हा वाहतूक नाही

ई-पास शिवाय आंतरजिल्हा वाहतूक नाही

Next
ठळक मुद्देकोरोना संसर्गाबाबत खबरदारी : हरणघाट चेकपोस्टवर वाहनांची कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ा सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून ई-पास तसेच शेतीच्या पासेसशिवाय वाहनधारक व नागरिकांना जिल्ह्याच्या आत व जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देत नसल्याचे दिसून येत आहे. चामोर्शी-मूल मार्गावरील हरणघाट चेकपोस्टवर आवागमन करणाऱ्या वाहनधारकांची कसून तपासणी केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडचिरोली जिल्हाच्या हद्दीत प्रवेश व जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची पोलिसातर्फे तपासणी केली जात आहे. हरणघाट येथील चेकपोस्टवर आवागमन करणाऱ्या नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन, पोलीस व महसूल विभागातर्फे दक्षता घेतली जात आहे.

 

Web Title: There is no inter-district transport without e-pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.