जिल्हाभरातील तलाठी आंदोलनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:28 AM2019-08-08T00:28:59+5:302019-08-08T00:31:48+5:30

विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पुरवठा विभागाची स्वतंत्र आकृतीबंद असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली आहे.

On the Talathi agitation across the district | जिल्हाभरातील तलाठी आंदोलनावर

जिल्हाभरातील तलाठी आंदोलनावर

Next
ठळक मुद्देशासकीय कामे ठप्प : १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
पुरवठा विभागाची स्वतंत्र आकृतीबंद असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली आहे. याची चौकशी करावी, १२ व २४ वर्ष सेवा झालेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्यावा. मंडळ अधिकारी संवर्गाच्या गोपनीय अहवालाच्या नस्ती आस्थापन शाखेतून गहाळ झाल्याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी. तलाठ्यांचे स्थायीकरणाचे आदेश द्यावेत. तलाठ्यांच्या उपविभागाबाहेर विनंती बदल्या कराव्या. अतिरिक्त साजाचा कार्यभार असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना अतिरिक्त सादील भत्ता व मेहनताना द्यावा. मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, परस्पर अदलाबदलीच्या कालबाह्य धोरणाची अंमलबजावणी थांबवावी. सेवा ज्येष्ठता यादी विहीत कालावधीत प्रसिद्ध करावी. व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियाद्वारे दिलेले अतितत्काळ आदेश पाळणे बंधनकारक करू नये. कोतवालांचे आदेश तलाठी कार्यालयात करताना परत न झालेल्या कोतवालांच्याबाबत तहसीलदार यांच्या प्रमाणपत्राची योग्य चौकशी करावी. जमिनविषयीची बरीच माहिती आॅनलाईन आहे. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती या कामाव्यतिरिक्त इतर शासकीय कामे सुट्टीच्या दिवशी व रात्री करण्यासाठी सक्ती करू नये. कोणत्याही विभागाची कामे पटवारी, मंडळ अधिकारी वर्गावर लादली जातात. ती कामे ज्या विभागाशी संबंधित आहेत, त्यांच्याकडून त्यांचा आढावा घ्यावा. फेरफारच्या नोंद एक महिन्याच्या आत निकाली काढण्याची सक्ती करू नये, मेघा कुळमेथे यांची पदस्थाना त्यांच्या मूळ पदावर आसरअल्ली येथे तलाठी म्हणून करावी आदी मागण्यांसाठी तलाठी आंदोलन करीत आहेत. सदर आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
टप्प्यानुसार सुरू आहे तलाठ्यांचे आंदोलन
तलाठ्यांच्या मागण्या सोडवाव्या, यासाठी विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करून निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे २ व ३ आॅगस्ट रोजी जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी काळ्याफिती लावून काम केले. ५ आॅगस्ट रोजी सामूहिक रजा टाकून उपविभागस्तरावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. ६ आॅगस्टपासून ८ आॅगस्टपर्यंत शेतकºयांची सर्व कामे केली जात आहेत. मात्र शासकीय कामे बंद ठेवण्यात आली आहेत. १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. त्यानंतरही शासनाने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कार्यालयाच्या चाव्या अधिकाºयांकडे सोपवून बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

Web Title: On the Talathi agitation across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप