उत्कृष्ट अभिनयासाठी सुरभी जांभुरे सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:01:05+5:30

‘दिव्यांग’ मराठी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय साकारल्याबद्दल सुरभी जांभुरे हिला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्काराने मुंबई येथील अंधेरी ओशिवारा लिंक रोडजवळ पार पडलेल्या ११ व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

Surabhi Jambhure honored for best performance | उत्कृष्ट अभिनयासाठी सुरभी जांभुरे सन्मानित

उत्कृष्ट अभिनयासाठी सुरभी जांभुरे सन्मानित

Next
ठळक मुद्देदादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : ‘दिव्यांग’ मराठी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय साकारल्याबद्दल सुरभी जांभुरे हिला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्काराने मुंबई येथील अंधेरी ओशिवारा लिंक रोडजवळ पार पडलेल्या ११ व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
देसाईगंज तालुक्यातील कुरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात मुमदेव जांभुरे यांची सुरभी ही मुलगी असून तिने एमएस्सी पर्यंत शिक्षण घेतले आहे. ‘दिव्यांग’ या अंध-अपंगांच्या जीवनावर आधारित असलेल्या मराठी चित्रपटात तिने उत्कृष्ट भूमिका साकारली. या चित्रपटाची निर्मिती दिनेश फुरकुंडे व दिग्दर्शन दिलीप कोसरे यांनी केले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून तिने दिव्यांगांशी आपुलकीने वागून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असा संदेश दिला. दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Surabhi Jambhure honored for best performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा