आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’वारी; ५० जणांची दक्षिण भारत सहल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 06:54 PM2020-01-15T18:54:16+5:302020-01-15T18:54:40+5:30

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

The students of the ashram school board 'ISRO'; South India tour of 50 people |  आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’वारी; ५० जणांची दक्षिण भारत सहल

 आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’वारी; ५० जणांची दक्षिण भारत सहल

Next

गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील ५० आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीतून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) भेट देण्याची संधी मिळाली. गडचिरोली, अहेरी आणि भामरागड या तीन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत ४३ आश्रमशाळा आणि २ एकलव्य शाळांमधून या विद्यार्थ्यांची निवड केली होती.

गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून नाविण्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत भारतभ्रमणाची ही अभ्यास सहल ७ ते १४ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या उपक्रमाचे कौतुक करून वेळोवेळी आवश्यक ते पाठबळ दिले. इस्रो संस्थेमध्ये या आदिवासी विद्यार्थ्यांना भेट मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी विशेष प्रयत्न केले.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी विद्यार्थ्यांना विमानाने दक्षिण भारतातील महत्वाची ठिकाणे यावेळी दाखविण्यात आली. त्यांना जिल्ह्याबाहेरील जग पाहता आणि अभ्यासता यावे, चांगल्या शिक्षणानंतर चांगल्या ठिकाणी काम करू शकतो याचे महत्व त्यांना कळावे हा या सहलीचा उद्देश असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले. या सहलीच्या आयोजनासाठी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी विशेष प्रयत्न केले. सहलीमध्ये समन्वयक म्हणून अनिल सोमनकर, भास्कर मदनकर, गजेंद्र सोनोने, निरमा ढाकरे, सविता शेंडे यांनी काम पाहिले.

या ठिकाणी दिल्या भेटी

या अभ्यास सहलीदरम्यान दक्षिण भारतातील बंगलोर, म्हैसूर, वायनाड, कोची या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. यादरम्यान इस्रो अंतराळ संस्था, नेहरु प्लॅनेटोरीयम, एअरोस्पेस संग्रहालय, कोची येथील मरीन ड्राईव्ह इत्यादी ठिकाण विद्यार्थ्यानी पाहिले. पर्यटनाचा आनंदही त्यांनी घेतला. त्यात म्हैसूर प्राणीसंग्रहालय, इस्कॉन मंदिर, विविध राजवाडे, संग्रहालय पाहण्यासह बोटींगचा आनंदही मुलांनी घेतला.

पहिल्यांदाच ठेवला जिल्ह्याबाहेर पाय

सहलीवरून परत आल्यावर मुलांना भेटीदरम्यान आलेले अनुभव इतरांना सांगण्यासाठी सेमाना मार्गावरील इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी मुलांशी संवाद साधला. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याने आपले अनुभव सांगितले. यातील जवळजवळ सर्वच मुले पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेरही गेली होती. याशिवाय त्यांनी प्रथमच विमान पाहण्याचा आणि त्यात बसण्याचा अनुभव घेतला. यावेळी जिल्हाधिकाºयांनी सहलीत मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या जीवनात निश्चित करा, असा सल्ला मुलांना दिला.

Web Title: The students of the ashram school board 'ISRO'; South India tour of 50 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.