राज्य शासन शहीद पोलीस परिवारांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:43+5:30

गेल्या १७ मे रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि पोलीस शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहात गृहमंत्र्यांनी आत्राम यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शाहीन हकीम आदी उपस्थित होते.

State Government with the support of martyred police families | राज्य शासन शहीद पोलीस परिवारांच्या पाठीशी

राज्य शासन शहीद पोलीस परिवारांच्या पाठीशी

googlenewsNext
ठळक मुद्देगृहमंत्र्यांची ग्वाही; अहेरीचा दौरा करून शहीद शिपायाच्या कुटुंबीयांचे सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (दि.६) अहेरीचा दौरा करून १७ मे रोजी शहीद झालेल्या पोलीस जवानाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. राज्य शासन नक्षल्यांशी मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस परिवारांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
गेल्या १७ मे रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि पोलीस शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहात गृहमंत्र्यांनी आत्राम यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शाहीन हकीम आदी उपस्थित होते.
राज्यात कोरोना संसर्गजन्य आजाराचे थैमान सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस विभाग कोरोनासोबतच नक्षल्यांशी मुकाबला करून उत्तम कामगिरी बजावत असल्याचे कौतुकही गृहमंत्र्यांनी केले. नक्षल्यांशी आणि कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया यावेळी ना.देशमुख यांनी दिली.

शहीद परिवारातील सदस्याला नोकरी
गृहमंत्र्यांनी अहेरीच्या या दौऱ्यात स्थानिक प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात शहीद पोलिसांच्या परिवारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. सर्वप्रथम शहीद जवान किशोर आत्राम यांची विरमाता, विरपत्नी, भाऊ, बहिनी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्य शासन शहीद कुटुंबीयांच्या पूर्णपणे पाठीशी राहणार असून अनुकंपा तत्वावर कुटुंबीयातील एकाला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Web Title: State Government with the support of martyred police families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस