शेतकऱ्यांचे उभे पीक जात आहे पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 06:00 AM2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:28+5:30

तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्या ५० वर्षापासून जलसिंचन प्रकल्प रेंगाळत आहेत. यामुळे मेडीगड्डाचे पाणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरत आहे.

The standing crop of the farmers is being watered | शेतकऱ्यांचे उभे पीक जात आहे पाण्यात

शेतकऱ्यांचे उभे पीक जात आहे पाण्यात

Next
ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणेची डोळ्यावर पट्टी : मेडिगड्डाच्या पाण्याखाली बुडणाºया पिकांमुळे शेतकरी हवालदिल

कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा सरकारच्या बहुचर्चित मेडिगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा राज्य सुजलाम-सुफलाम होत असले तरी या बॅरेजच्या बॅक वॉटरमुळे महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जात आहे. हजारो हेक्टरमधील उभे पीक पाण्याखाली जात असताना तालुका किंवा जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी, तोंडावर बोट ठेवून असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
अवघ्या तीन वर्षात तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडिगड्डा या भव्य प्रकल्पामुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेतीला सिंचन होण्यासोबतच या प्रकल्पाचे पाणी त्या राज्यातील कोट्यवधी लोकांची तहान भागवणार आहे. परंतू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प मरणदायी ठरण्याची शक्यता आता बळावली आहे. यावर्षी पहिल्यांदाच या प्रकल्पाचे पाणी अडविल्यानंतर प्रकल्पाचे पाणी बुडित क्षेत्रालगतच्या शेतांमधील पिकांमध्ये पसरत आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेले उभे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असताना प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
सिरोंचा तालुक्यातील वडधम (पोचमपल्ली) गावाजवळील मेडिगड्डा प्रकल्पाच्या बॅरेजचे दरवाजे बंद केल्याने प्राणहिता नदीतील वर्षभर वाहणारे प्रकल्पाचे पाणी वेगाने मागे जाऊन महाराष्ट्राच्या बाजूने गोदावरी व प्राणहिता नदीच्या खोऱ्यातील मूग, ज्वारी, चना, भूईमूग यासारख्या रबी पिकांना फटका बसत आहे.
तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्या ५० वर्षापासून जलसिंचन प्रकल्प रेंगाळत आहेत. यामुळे मेडीगड्डाचे पाणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरत आहे.
पाण्याखाली गेलेल्या शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नुकसानभरपाई कोण देणार?
हाताशी आलेले पीक आता वाया जाणार या चिंतेने ग्रस्त शेतकºयांना आता या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा प्रश्न पडला आहे. पीकांची नुकसानभरपाई महाराष्ट्र सरकार देणार, की तेलंगणा सरकार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने आापल्या शेतकºयांच्या फायद्या-तोट्याचा विचार न करता तेलंगणा सरकारला पूर्ण मदत केली. त्यामुळे आता राज्य सरकारनेच शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.

अधिकारी बेजबाबदार
मेडिगड्डाच्या बॅक वॉटरमुळे पोचमपल्ली, पेंटीपाका, आरडा, सिरोंचा, मेडाराम, कारासपल्ली, रंगाय्यपली, कोठा, पोचमपल्ली आदी गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. यात तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना आतापर्यंत तालुका प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने तिकडे फिरकूनही पाहिले नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Web Title: The standing crop of the farmers is being watered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.