बस स्थानकाच्या कामास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:33+5:30

तेलंगणा, महाराष्ट्रराज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरीलपुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटक कालेश्वर मंदिर व मेडिगड्डा धरण पाहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी उसळते.

Speed to the bus station | बस स्थानकाच्या कामास वेग

बस स्थानकाच्या कामास वेग

googlenewsNext
ठळक मुद्देपाच कोटी रूपयांतून सुरू आहे बांधकाम : प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : शासनाच्या पाच कोटी रूपयांच्या निधीतून सिरोंचा येथे बसस्थानक इमारतीचे बांधकाम सुरू असून या कामाने आता वेग घेतला आहे. खोदकाम आटोपले असून कॉलम उभारण्यात आले आहे. खासगी कंत्राटारामार्फत हे काम मजुरांकरवी सुरू आहे.
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्रराज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरीलपुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटक कालेश्वर मंदिर व मेडिगड्डा धरण पाहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी उसळते. सिरोंचा येथे सर्व सोईसुविधा युक्त सुसज्ज बस स्थानक व्हावे, अशी मागणी येथील जनतेने अनेक वर्षांपासून केली होती.
सिरोंचा येथे हायटेक बस स्थानक व्हावे, यासाठी तत्कालीन राज्य शासनाकडे लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने सिरोंचा येथे सिरोंचा येथील बसस्थानकासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
सिरोंचा शहर हे महत्त्वाचे शहर असून गडचिरोली जिल्हा होण्यापूर्वी या शहराला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला होता. सिरोंचा येथे सोमनूर संगम, कालेश्वर व इतर पर्यटनस्थळे असल्याने पर्यटकांची तालुक्यात वर्दळ असते. मात्र सिरोंचा येथे प्रशस्त बसस्थानक नसल्याने दूरवरून आलेल्या प्रवाशांची परवड होत असते. आता नव्या स्वरूपाचे बसस्थानक होणार असून या कामाकडे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेचे संपूर्ण लक्ष आहे. पावसाळ्यापूर्वी सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण करून प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी सिरोंचा शहरासह अहेरी उपविभागातील प्रवाशांनी केली आहे.

नव्या बसगाड्या उपलब्ध करण्याची मागणी
राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारामार्फत सिरोंचा तालुक्यासह संपूर्ण अहेरी उपविभागात शेकडो बसगाड्या दररोज चालविल्या जातात. मात्र उपविभागाच्या दुर्गम भागात जाणाºया बसगाड्या या पूर्णत: भंगार झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागासाठी शासनाने नव्या बसगाड्या उपलब्ध कराव्या, अशी मागणी आहे.

Web Title: Speed to the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.