जुनी पेंशनसह इतर प्रश्न मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:22+5:30

जुनी पेंशन याेजना लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांचे इतर सेवाविषयक प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना शाखा अहेरीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे बहुजन कल्याण आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी प्रवीण टाेंगे, निशिकांत निमसरकार, भगवान मडावी, नारायण सिडाम, रहीम पठाण, अवधूत धनजे, ज्याेती आत्राम, सरस्वती अर्का, उद्धव गाेल्हार, राकेश श्रीरामवार, राजेंद्र दहीफळे, दुधराम कुमरे आदी उपस्थित हाेते. 

Sort out other issues including old pension | जुनी पेंशनसह इतर प्रश्न मार्गी लावा

जुनी पेंशनसह इतर प्रश्न मार्गी लावा

Next
ठळक मुद्देबहुजन कल्याण मंत्र्यांना साकडे

  लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जुनी पेंशन याेजना लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांचे इतर सेवाविषयक प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना शाखा अहेरीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे बहुजन कल्याण आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी प्रवीण टाेंगे, निशिकांत निमसरकार, भगवान मडावी, नारायण सिडाम, रहीम पठाण, अवधूत धनजे, ज्याेती आत्राम, सरस्वती अर्का, उद्धव गाेल्हार, राकेश श्रीरामवार, राजेंद्र दहीफळे, दुधराम कुमरे आदी उपस्थित हाेते. 
निवेदनात म्हटले आहे की, नवीन पेंशन याेजना कर्मचाऱ्यांना जशी नुकसानकारक आहे, तशीच ती सरकारसाठीही ताेट्याची आहे. त्यामुळे जुनी पेंशन याेजना लागू करावी, अशी मागणी आहे. निवेदनात, दहा वर्ष सेवा हाेण्यापूर्वी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये सानुग्रह अनुदान अदा करून वारसदारांना अनुकंपाचा लाभ देण्यात यावा, सन २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वारसास फॅमिली पेंशन व ग्रॅज्युटीचा लाभ द्या, विषय शिक्षकासाठीची एक तृतीयांश वेतन श्रेणीची अट रद्द करून सर्वच शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, सर्व शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ काेणत्याही अटीशिवाय कायम ठेवण्यात यावा, विना अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान देण्यात यावे आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. 
दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत ना. विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डाॅ.नामदेव उसेंडी, जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार व इतर पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Sort out other issues including old pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.