आतापर्यंत ४९ हजार लोक परतले जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:51+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठविले. अडकलेल्या नागरिकांना नेण्या-आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली होती.

So far 49,000 people have returned to the district | आतापर्यंत ४९ हजार लोक परतले जिल्ह्यात

आतापर्यंत ४९ हजार लोक परतले जिल्ह्यात

Next
ठळक मुद्दे९५१७ लोक विलगीकरणात : ३९,६७८ लोकांनी पूर्ण केला विलगीकरण कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ४९ हजार लोकांनी आपला गृहजिल्हा गडचिरोली गाठला आहे. त्यातील २२ हजार ६८८ लोक १ मे नंतर आले आहेत. आतापर्यंत ३९ हजार ६७८ लोकांनी संस्थात्मक आणि गृह विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे, तर अलिकडे जिल्ह्यात दाखल झालेले ९५१७ लोक अजूनही विलगीकरणात आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने विलगिकरण कक्षातील लोकांची संख्याही वाढत आहे. यासोबतच आता रेड झोनमधून आलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविल्या जात आहेत. आतापर्यंत १३५६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी २६ जण पॉझिटिव्ह तर ७९४ जण निगेटिव्ह आढळले. अजून ५३६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठविले. अडकलेल्या नागरिकांना नेण्या-आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली होती. जिल्हा प्रशासनाकडून इतर राज्यातील प्रवाशांना चंद्रपूर, नागपूर व शेजारील राज्यांच्या सीमावर्ती भागात सोडण्यात आले. तर आपल्याकडे परत येणाऱ्यांना सुखरूप बसेसने आणण्यात आले. बाहेर जाणाऱ्यांमध्ये उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश व राजस्थान या राजांचा समावेश होता. यातील मध्यप्रदेश शिवणी येथे राज्य सीमेवर जिल्हा प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. उर्वरीत सर्व नागपूर येथून बस व रेल्वेने स्वराज्यात परतले.
शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यासह मुंबई, पुणे, नागपूर व इतर जिल्हयातून २२ हजार ६८८ नागरिक १ मे नंतर जिल्ह्यात पोहोचले आहेत. गडचिरोली जिल्हयात अडकून पडलेल्या २३७४ लोकांना प्रशासनाकडून स्वजिल्हयात जाण्यास परवानगी देण्यात आली.

प्रत्येकाने खासगी नोंदवही ठेवावी
कोरोना हा संसर्ग बाधिताच्या संपर्कात आल्याने होतो. टाळेबंदी असल्याने इतर लोकांशी कमीत कमी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. यातूनही नकळत कोणा बाधित व्यक्तीशी संपर्क आला तर त्यामध्ये पुढील संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ‘पर्सनल डायरी’ म्हणजेच खाजगी नोंदीवही ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आल्याने आता प्रशासन बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे. यातूनच ही संकल्पना आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचे नाव दिले तर पुन्हा त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तात्काळ घेऊन ही संसर्ग साखळी वेळेत रोखता येईल.

आणखी एका पॉझिटिव्हची भर
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी आणखी एकाची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या २६ झाली आहे. सदर रुग्ण मुलचेरा तालुक्यातील विलगिकरण कक्षात होता. यापूर्वीच्या रुग्णांप्रमाणे तोसुद्धा मुंबईवरून आलेला होता आणि तेव्हापासून विलगिकरणात होता. त्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्यानंतर इतरही रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जात आहेत.

Web Title: So far 49,000 people have returned to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.