Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत आतापर्यंत २४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:14 PM2020-05-25T20:14:37+5:302020-05-25T20:28:49+5:30

सोमवारी ९ कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २४ वर गेली आहे.

So far 24 positive in Gadchiroli | Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत आतापर्यंत २४ पॉझिटिव्ह

Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत आतापर्यंत २४ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रीन झोन म्हणून ओळखल्या जात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला. राज्याच्या एका टोकावर असलेल्या व जंगलाने वेढलेल्या या जिल्ह्यात कोरोनाची लागण होणार नाही किंवा कमी होईल असा सर्वसामान्यांचा अंदाज खोटा पाडत कोरोनाने आपली पावले तेथेही रोवण्यास सुरुवात केल्याचे वास्तव दररोज समोर येत आहे.  सोमवारी ९ कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २४ वर गेली आहे. ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदाच ५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर नियमितपणे रुग्णांची भर पडत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण मुंबई आणि पुण्यावरून आलेले असून ते संस्थात्मक विलगिकरणात होते.

 

 

Web Title: So far 24 positive in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.