आणखी सात जणांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:41+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्या ७ जणांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा गजर करत दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. घरी सोडण्यात आलेले हे सातही जण एटापल्ली तालुक्यातील आहेत.

Seven others defeated Corona | आणखी सात जणांनी केली कोरोनावर मात

आणखी सात जणांनी केली कोरोनावर मात

Next
ठळक मुद्दे२० रुग्ण बाधित : १९ जण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात गुरूवारी (दि.४) एका कोरोनारुग्णाची भर पडल्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४० वर गेली आहे. मात्र याचवेळी गुरूवारी ७ लोकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत सुटी झालेल्यांची संख्या आता १९ झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्या ७ जणांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा गजर करत दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. घरी सोडण्यात आलेले हे सातही जण एटापल्ली तालुक्यातील आहेत. आता २० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. एका रुग्णाचा गेल्या १ जून रोजी हैदराबाद येथे मृत्यू झाला आहे.
दरम्यान क्षयरोगाच्या चाचणीत वापरल्या जाणाऱ्या निदान यंत्रांचा वापर कोविड-१९ तपासणी करण्यासाठी आयसीएमआरकडून नुकतीच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही या प्रकारच्या चाचणीला परवानगी देण्यात आली. त्याची सुरूवात नवीन प्रयोगशाळेत करण्यात आली.

प्रयोगशाळेचे उद्घाटन, ५० मिनिटात अहवाल
जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रूनॅट कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते झाले. या प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटिव्ह नसल्यास तसा अहवाल मिळेल. मात्र रु ग्णाला कोविड-१९ ची बाधा झाल्याची खात्री होण्यासाठी नागपूर येथेच संशयिताचे नमुने पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूरला नमुने पाठविण्याचा ताण कमी होणार आहे. कोरोना संसर्ग झाला नसल्याचे निदान केवळ ५० मिनिटांमध्ये होणार आहे. जिल्हयातील जास्त जोखमीच्या रूग्णांचे अहवाल या प्रयोगशाळेत तात्काळ स्वरूपात तपासता येतील.
 

Web Title: Seven others defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.