‘निर्माण’साठी २२७ युवांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:42+5:30

आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी व्हावा अशी इच्छा असणाऱ्या युवांना ओळखून त्यांना संघटीत व मार्गदर्शन करण्यासाठी निर्माण ही शौक्षणिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. युवांना त्यांची कौशल्ये व सामाजिक आव्हानांची सांगड घालून समृद्ध व समाधानी जीवन जगण्यास प्रवृत्त करणे हे निर्माण प्रक्रियेचे ध्येय आहे.

A selection of 227 youths to 'Nirman' | ‘निर्माण’साठी २२७ युवांची निवड

‘निर्माण’साठी २२७ युवांची निवड

Next
ठळक मुद्देचातगाव येथील सर्चचा उपक्रम : २७ डिसेंबर ते ७ मार्चपर्यंत चालणार शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्च संस्थेचे संस्थापक व संचालक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी २००६ पासून युवा निर्मितीसाठी सुरू केलेल्या ‘निर्माण’ उपक्रमाच्या दहाव्या सत्रास लवकरच सुरुवात झाली आहे. देशभरातील २२७ युवांची शिबिरासाठी निवड झाली आहे. यामध्ये १२२ युवती आणि १०५ युवकांचा सहभाग आहे. तब्बल एक हजार अर्जांमधून ही निवड करण्यात आली आहे.
आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी व्हावा अशी इच्छा असणाऱ्या युवांना ओळखून त्यांना संघटीत व मार्गदर्शन करण्यासाठी निर्माण ही शौक्षणिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. युवांना त्यांची कौशल्ये व सामाजिक आव्हानांची सांगड घालून समृद्ध व समाधानी जीवन जगण्यास प्रवृत्त करणे हे निर्माण प्रक्रियेचे ध्येय आहे. सर्च येथे होणाºया या शिबिरांदरम्यान स्वत:ची ओळख, आजूबाजूच्या समाज व निसर्गाची ओळख, समाजातील विविध प्रश्न व त्या सोडवण्याच्या वेगवेगळया पद्धती, प्रत्यक्ष सामाजिक काम करणाºया वेगवेगळया लोकांसोबत चर्चा अशा टप्प्यांमधून जाताना ‘मी जीवनात काय करू’ या निर्णयापर्यंत शिबिरार्थी येतात. २०१८-१९ पर्यंत निर्माणच्या ९ बॅचेस पार पडल्या असून महाराष्ट्रासह देशभरात विविध शैक्षणिक पार्श्वभूमीचे १२०० निर्माणी पसरलेले आहेत. त्यांच्यापैकी सुमारे ३५० जण कुठल्या ना कुठला सामाजिक प्रश्नावर काम करीत आहेत.
यावर्षीच्या निर्माणचे दहावे सत्र लवकरच सुरू होत आहे. या सत्रासाठीच्या निवड प्रक्रियेत तब्बल १ हजार अर्ज निर्माणकडे आले होते. विविध पातळ्यांवर घेतलेल्या मुलाखतींमधून निर्माणच्या दहाव्या सत्रासाठी २२७ युवांची निवड करण्यात आले आहे.
यामध्ये मराठवाड्यातील २९, उत्तर महाराष्ट्रातील ३०, पश्चिम महाराष्ट्रातील २८, पूर्व विदर्भातील ३२, पश्चिम विदर्भातील ३०, मुंबईतील २५, पुण्यातील १५, कोकणातील १ याचबरोबर विविध राज्यातील युवांचा समावेश आहे. निवड झालेल्या २२७ युवांना तीन शिबिरात विभागण्यात आले आहे. या सत्रातील पहिले शिबीर २७ डिसेंबर २०१९ ते ४ जानेवारी २०२० दरम्यान, दुसरे शिबीर ८ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत तर तिसरे शिबीर २९ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत होत आहे.

प्रथमच ‘निर्माण एक्स’ प्रयोग
प्रत्येकाची काम करण्याची आवड, पद्धती आणि कल वेगळा असतो. निर्माण निवड प्रकियेदरम्यान ही बाब नेहमीच प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे अशा युवांना लक्षात घेत त्यांच्यासाठी निर्माण एक्स नावाने वेगळा कृतीकार्यक्रम तयार करण्याचा प्रयोग प्रथमच दशकपूर्तीच्या निमित्ताने केला जाणार आहे.

Web Title: A selection of 227 youths to 'Nirman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.