‘त्या’ मृत बिबट्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:29+5:30

१७ नोव्हेंबर रोजी कुरूंझानजीकच्या जंगल परिसरात एका गुराख्याला बिबट मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरला गुराख्यासमवेत मोहीम राबविल्यानंतर कक्ष क्रमांक ३ मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला.

Samples of 'those' dead babies in the judicial laboratory | ‘त्या’ मृत बिबट्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत

‘त्या’ मृत बिबट्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत

Next
ठळक मुद्देचंद्रपुरातून येणार अहवाल : वन विभागाची अधिकृत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कुरूंझानजीकच्या पाल नदीच्या परिसरात चुरचुरा कक्ष क्रमांक ३ मध्ये मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या अवयवाचे नमुने चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळणार आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकृत सूत्रांकडून मिळाली.
१७ नोव्हेंबर रोजी कुरूंझानजीकच्या जंगल परिसरात एका गुराख्याला बिबट मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरला गुराख्यासमवेत मोहीम राबविल्यानंतर कक्ष क्रमांक ३ मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला. वडसा वन विभागाचे एसीएफ बी.व्ही. कांबळे, पोर्लाचे वन परिक्षेत्राधिकारी एम.चांगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रामटेके व वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शवविच्छेदन केले. मृत बिबट्याचे पाच ते सहा नमुने व्हिसेरा तपासणीसाठी चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून तेथून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे, असे वडसा वन विभागाचे एसीएफ बी. व्ही. कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पशुवैद्यकीय अधिकाºयाच्या अंदाजानुसार रानडुकराचे मांस खाल्याने संसर्ग होऊन सदर बिबट्याचा मृत्यू झाला असावा. मात्र हा प्राथमिक अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.

एका वाघिणीसह दोन बछड्यांचा वावर
पोर्ला वन परिक्षेत्रात एक वाघीण व तिचे दोन बछडे संचार करीत असल्याचे दिसून आल्याने या भागातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोर्ला-देलोडा मार्गावर पोर्लापासून चार किमी अंतरावर बुधवारी काही नागरिकांना वाघीण व तिच्या बछड्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली आहे. वन विभागानेही या भागात वाघीण असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. गावात दवंडी देऊन व दर्शनी भागात फलक लावून नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा वन विभागातर्फे देण्यात आला आहे.

सावंगी परिसरात बिबट्याची दहशत
देसाईगंज : देसाईगंजपासून तीन किमी अंतरावर असलेल्या सावंगी परिसरातील टेकडी परिसरात नर व मादी बिबट आढळून येत आहे. मागील १५ दिवसांपासून बिबट्यांनी बस्तान मांडले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. बिबट्यांच्या या जोडीने गांधीनगर येथील जवळपास १० शेळ्यांचा फडशा पाडला आहे. गावात बिबट येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री बाहेर निघण्यास नागरिक तयार होत नाही.

कोंढाळा, कासवी परिसरातही पट्टेदार वाघ अनेकांना आढळून येत आहे. याच वाघाने कोंढाळा परिसरातील अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. कोंढाळा हे गाव देसाईगंज-आरमोरी मार्गावर येते. या परिसरातून प्रवास करताना प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Web Title: Samples of 'those' dead babies in the judicial laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ