पेसा सुधारणेसह ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 06:00 AM2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:22+5:30

कुणबी समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात रविवारी घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार फुके बोलत होते.

Reservation of OBCs with pay reform will be 90% | पेसा सुधारणेसह ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के होणार

पेसा सुधारणेसह ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के होणार

Next
ठळक मुद्देपरिणय फुके यांची ग्वाही : कुणबी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा रंगला

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आल्याने ओबीसींवर सातत्याने अन्याय होत आहे. हा प्रश्न आपण शासन दरबारी पोहोचविला आहे. या मुद्यावर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने पेसा सुधारणा व ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याबाबतचा जीआर लवकरच निघणार आहे, अशी ग्वाही राज्याचे बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिली.
कुणबी समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात रविवारी घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार फुके बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती म्हणून खा. अशोक नेते, आ.डॉ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, चंद्रपूर जि.प.चे उपाध्यक्ष कृष्णा चहारे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, कुणबी समाजाचे युवा नेते प्रशांत वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ना. परिणय फुके यांच्या हस्ते कुणबी समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कुणबी समाजातील जि.प. सदस्य, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वाघरे, संचालन राजेंद्र गोहणे, अरूणा गोहणे यांनी केले तर आभार कुणबी समाज संघटनेचे युवा नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मानले.
पुढे बोलताना ना. फुके म्हणाले, १० सप्टेंबरपूर्वी पेसा अधिसूचना व गावांच्या सुधारणेबाबत शासन निर्णय निघणार आहे. त्यानंतर लवकरच गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण नॉनपेसा क्षेत्रात १९ टक्के करण्याबाबतचा जीआर निघणार आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत, असे ते म्हणाले. कुणबी समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र राहून आपली ताकद दाखविली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कुणबी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर असून न्याय न मिळाल्यास प्रसंगी सरकारच्या विरोधात मोर्चा व आंदोलन करणार, असा दिलासा त्यांनी कुणबी समाज बांधवांना दिला.
याप्रसंगी खा.अशोक नेते, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी समाज बांधवांना संबोधित केले. अनिल म्हशाखेत्री यांनी अध्यक्षीय भाषणातून कुणबी समाजाची परिस्थिती विस्तृतपणे मांडली.
या लोकप्रतिनिधींचा झाला सन्मान
कुणबी समाज संघटनेच्या वतीने समाजातील घटक असलेल्या देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, गडचिरोली न.प.चे नगरसेवक रमेश चौधरी, सतिश विधाते, केशव निंबोड, प्रविण वाघरे, वर्षा वासुदेव बट्टे, तसेच नगरसेवक सागर मने, गीता सेलोकर, सुनिता मने, माणिक भोयर, दीपक झरकर, रेखा ठाकरे, आशा राऊत, सचिन खरकाटे व भाविका तलमले यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय जि.प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, मनिषा दोनाडकर, विद्या हिंमत आभारे, संजय चरडुके, कविता भगत, रोशणी पारधी, रमाकांत ठेंगरी तसेच पं.स. उपसभापती मनोज जुनेदार, विवेक खेवले, निता ढोरे, अर्चना ढोरे, रेखा अलोणे, शेवंता अवसरे, माधवराव अरसोडे, वंदना गौरकार, रामरतन गोहणे, सतिश विधाते, जान्हवी भोयर आदींचा गौरव करण्यात आला. नगर पंचायतीचे सदस्य अविनाश चौधरी, दिपाली देशमुख, रामहरी उगले, देवा चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य अजय लोंढे, गोविंद भेंडारकर, हेमराज लडके, सुनील शेरकी, संध्या येलेकर यांचा सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले विठ्ठल चौथाले व प्रमोद खांडेकर यांचाही गौरव झाला.
या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव
इयत्ता दहावी व बारावीत ८० टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता बारावीतील डिमराव आभारे, स्वानंद जवादे, केतन राऊत, युवराज कारेकर, पियुष मस्के, सुरज केशव निंबोड, मधुरा भोयर आदींचा समावेश आहे. इयत्ता दहावीतील अश्रय बट्टे, वेदांत लोंढे, मंगेश ठवरे, छकुली टिचकुरे, साहिली सातपुते, प्रितम चौधरी, तेजस बोडे, साक्षी ठाकरे, रसिका डोंगरे, मनिष आंबटकर, पूर्विका किरमिरे, स्वप्नील ढोरे, समीर कुत्तरमारे, भावेश पाल, वैष्णवी पाल, दिव्या गौरकार, गिरीधर वामनकर, गोवर्धन चौधरी, स्वागत जवादे, स्वराज झाडे, यश गौरकार, संकेत मलोडे, वसुधा झरले, जान्हवी भोयर, आचल खेवले, रंजना आसुटकर, शुभांगी ढोंगे, मानसी आभारे व अंजली निंबार्ते आदींचा समावेश आहे.

Web Title: Reservation of OBCs with pay reform will be 90%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.