रुग्णांचे नातेवाईक बनताहेत सुपरस्प्रेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:38 AM2021-05-07T04:38:53+5:302021-05-07T04:38:53+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पण लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य स्वरूपाच्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. ...

Relatives of patients become superspreaders | रुग्णांचे नातेवाईक बनताहेत सुपरस्प्रेडर

रुग्णांचे नातेवाईक बनताहेत सुपरस्प्रेडर

Next

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पण लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य स्वरूपाच्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनीही इतरांना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेऊन घराबाहेर पडायलाच नको. कोरोना विषाणूच्या संसर्गाने रुग्ण फणफणत असताना त्याचे नातेवाईक आपले दुकान उघडून आपला व्यवसाय करीत आहेत. तर कोणी घरात संपलेले सामान घेण्यासाठी बिनधास्तपणे बाजारपेठेत फिरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. हे नागरिक काेराेना विषाणूचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, देसाईगंज शहरातील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त काही दुकाने अर्धवट शटर उघडून सुरू आहेत.

देसाईगंज हा जिल्ह्यातील औद्यागिक दृष्ट्या प्रगत तालुका आहे. देसाईगंज शहरातील अनेक नागरिक देश-विदेशांत राहतात. असे असतानाही मागील वर्षी पहिल्या काेराेना लाटेच्या वेळी देसाईगंज तालुका काेराेनामुक्त हाेता. त्यानंतरही काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेती. आता मात्र देसाईगंज तालुक्यात काेराेना राेगाने थैमान घातले आहे. सध्या देसाईगंज तालुक्यात ४९० सक्रिय काेराेना रुग्ण आहेत. गडचिराेली तालुक्यानंतर सर्वाधिक रुग्ण गडचिराेली तालुक्यात आहेत. प्रशासनाने कठाेर पावले उचलण्याची गरज आहे. प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने बाजारपेठेत माेठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे.

बाॅक्स

‘त्या' अनधिकृत कोविड हॉस्पिटलमध्ये मृतकांची संख्या ५० पेक्षा अधिक

देसाईगंज नगर परिषदच्या हद्दीत दोन हॉस्पिटलमध्ये अनधिकृतपणे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने या रुग्णालयांना सील ठाेकले आहे. या अनधिकृत रुग्णालयांमध्ये मागील एक वर्षाच्या आत ५० पेक्षा अधिक काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. याची चाैकशी करण्याची गरज आहे. या रुग्णालयांमध्ये गडचिराेली जिल्ह्यासह चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांतीलही रुग्ण उपचार घेत हाेते. नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भरती करण्यापूर्वी कोरोना विषाणूने रुग्ण संसर्गित नाही, याची खातरजमा केल्याशिवाय रुग्णांना भरती करूच नये असे जिल्हा आरोग्य विभागाकडून वारंवार सांगितले जात आहे. या नियमाचे उल्लंघन करून काेेराेना रुग्णांवर उपचार केले जात हाेते. याबाबत मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके यांना विचारणा केली असता शहरातील दोन हॉस्पिटलकडे कोविड केअर हॉस्पिटलचा परवाना नाही. कोविडचे रुग्ण आढळले हे खरे आहे. चाैकशीसाठी पाचसदस्यीय समिती नेमली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई निश्चित होणार असे सांगितले.

Web Title: Relatives of patients become superspreaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.