पाच तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी; राेवणी खाेळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 05:00 AM2021-07-19T05:00:00+5:302021-07-19T05:00:26+5:30

गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येते.  यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेती मशागतीची कामे अगदी वेळेवर आटाेपली.

Rainfall in five talukas; Ravani sighed | पाच तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी; राेवणी खाेळंबली

पाच तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी; राेवणी खाेळंबली

Next
ठळक मुद्देसरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षाही पडला कमी पाऊस; केवळ सिंचनाची साेय असलेल्याच शेतकऱ्यांनी आटाेपली कामे

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यातील गडचिराेली, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, धानाेरा या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तर पावसाने दडीच मारली असल्याने जिल्ह्यात काेरडा दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. 
गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. 
यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेती मशागतीची कामे अगदी वेळेवर आटाेपली. आता मात्र राेवण्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी राेवणी केली त्यांचे धान करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे. 
१७ जुलैपर्यंत जिल्ह्यात ४४५.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ४०१.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. सिराेंचा व देसाईगंज या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. उर्वरित दहा तालुक्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
सिचंनाची साधने असलेले शेतकरी तसेच नदी, नाल्यालगत शेती असलेले शेतकरी धान राेवणीचे काम करीत आहेत. परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्यापही जाेरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.  

राेवणीची कामे पडली ठप्प 
- आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या काही भागात थोडाफार पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी तसेच ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात आहे अशा शेतकऱ्यांनी धान रोहिणीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांद्यांमधील पाणी आटायला सुरुवात झाली आहे. परिणामी रोहिणीची कामे रखडली आहेत. धान लावणीच्या कामाला उशीर झाल्यास उत्पादनात घट होत असल्याचा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
- यावर्षी माेठा पाऊस अजूनही झाला नाही. एखादी तास पाऊस पडल्यानंतर लगेच ऊन निघते. त्यामुळे तापमान वाढत आहे. पाऊस व कडक ऊन यामुळे उकाड्यात वाढ आहे. दिवसा व रात्रीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

जलसाठे अर्धे रिकामेच
जिल्ह्यात अजूनही माेठा पाऊस झाला नाही. त्यामुळे तलावाच्या जलसाठ्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. मागील वर्षी जेवढा पाणीसाठा हाेता. त्यात थाेडी वाढ झाली आहे. तर जे जलसाठे पावसाळ्यापूर्वी काेरडे हाेते. ते आताही काेरडेच आहेत. विशेषकरून दरवर्षी उन्हाळ्यात बाेड्या काेरड्या पडतात. त्या आताही काेरड्याच आहेत. जाेपर्यंत जलसाठे भरत नाही. ताेपर्यंत उत्पादनाही हमी राहत नसल्याने शेतकरी समाधानी राहत नाही. 

 

Web Title: Rainfall in five talukas; Ravani sighed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस