आघाडी सरकारविरोधात गडचिरोलीत ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:28 PM2020-08-01T17:28:33+5:302020-08-01T17:29:22+5:30

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला दिलेला विजेचा धक्का दूर करून विजेचे ४ महिन्यांचे बिल माफ करावे आणि दुधाला प्रतिलिटर १० रु पये अनुदान द्यावे, अशी मागणी करत शनिवारी (दि.१) भाजपच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी महाएल्गार आंदोलन करण्यात आली.

Protests against the alliance government in Gadchiroli | आघाडी सरकारविरोधात गडचिरोलीत ठिकठिकाणी निदर्शने

आघाडी सरकारविरोधात गडचिरोलीत ठिकठिकाणी निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला दिलेला विजेचा धक्का दूर करून विजेचे ४ महिन्यांचे बिल माफ करावे आणि दुधाला प्रतिलिटर १० रु पये अनुदान द्यावे, अशी मागणी करत शनिवारी (दि.१) भाजपच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी महाएल्गार आंदोलन करण्यात आली.
यावेळी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. भाजपच्या काळात देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आल्याचे सांगत निदर्शने करण्यात आली. सरकारने दुधाचे अनुदान आणि वीज बिलाबाबतच्या मागण्या तातडीने मंजूर न केल्यास आणखी कडक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. गडचिरोलीसह देसाईगंज, आरमोरी शहरात आणि सर्व नगर पंचायत आणि जिल्हा परिषद सर्कलमध्ये हे आंदोलन करण्यात आले.

गडचिरोली शहरातील गांधी चौक येथे झालेल्या आंदोलनात आमदार डॉ.देवराव होळी यांच्यासह नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजप नेते गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री डॉ.भारत खटी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, माजी शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर अविनाश महाजन, संजय निखारे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, अनुसूचित जाती मोर्चाचे जनार्दन साखरे, नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, नगरसेवक प्रवीण वाघरे, भाजपा तालुका महिला आघाडी अध्यक्ष दुर्गा मंगर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले..

Web Title: Protests against the alliance government in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.